भारतीय क्रिकेटपटूंचं होणार Increament, BCCI कडून मॅच फी मध्ये वाढ

मुंबई तक

• 12:21 PM • 20 Sep 2021

कोरोनामुळे भारतात स्थानिक क्रिकेटला मोठा फटका बसला होता. २०२० मध्ये बीसीसीआयने याच कारणामुळे घरगुती क्रिकेट सामन्यांसह आंतरराष्ट्रीय सामनेही भरवले नाहीत. २०२१ पासून बीसीसीआयने मुश्ताक अली स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेटला सुरुवात केली. परंतू या काळात क्रिकेट सामने बंद असल्यामुळे ज्या खेळाडूंचं आर्थिक नुकसान झालं त्यांना बीसीसीआयने आता दिलासा दिला आहे. स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात वाढ […]

Mumbaitak
follow google news

कोरोनामुळे भारतात स्थानिक क्रिकेटला मोठा फटका बसला होता. २०२० मध्ये बीसीसीआयने याच कारणामुळे घरगुती क्रिकेट सामन्यांसह आंतरराष्ट्रीय सामनेही भरवले नाहीत. २०२१ पासून बीसीसीआयने मुश्ताक अली स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेटला सुरुवात केली. परंतू या काळात क्रिकेट सामने बंद असल्यामुळे ज्या खेळाडूंचं आर्थिक नुकसान झालं त्यांना बीसीसीआयने आता दिलासा दिला आहे.

हे वाचलं का?

स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असून खेळाडूंचं प्रलंबित राहिलेलं मानधनही बीसीसीआय देणार आहे. BCCI च्या वरिष्ठ कार्यकारणीची बैठक आज पार पडली ज्यात आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

१) २०२०-२१ च्या हंगामात रणजी ट्रॉफी आणि महिलांच्या टी-२० स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंना मोबदला दिला जाणार आहे. याचसोबत २०१९-२० बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट हंगामात सहभागी झालेल्या क्रिकेटपटूंना कोविड -१९ परिस्थितीमुळे गमावलेल्या २०२०-२१ च्या हंगामाची भरपाई म्हणून 50 टक्के मॅच फी मिळणार आहे.

याव्यतिरीक्त बीसीसीआयने खेळाडूंच्या मॅच फीमध्येही वाढ केली आहे.

सध्याच्या घडीला सिनीअर संघात Playing XI मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना ३५ हजार पर सामना तर राखीव खेळाडूंना १७ हजार ५०० रुपये मिळतात. या रकमेत वाढ करण्यात आलेली असून नवीन पे स्ट्रक्चर नुसार Playing XI मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना (पहिल्या २० सामन्यांपर्यंत) ४० हजार, २१ ते ४० सामन्यांपर्यंत ५० हजार तर ४० व्या सामन्यापासून पुढे ६० हजार रुपये मिळणार आहेत. याचसोबत २३ वर्षाखालील संघात खेळणारे खेळाडू, १९ वर्षाखालील संघात खेळणारे खेळाडू आणि १६ वर्षाखालील संघात खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे.

कर्णधारपद सोडण्याच्या Virat Kohli च्या निर्णयावर Jay Shah म्हणतात…

याचसोबत महिला क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना सध्या १२ हजार ५०० रुपये प्रत्येक सामन्याची फी मिळत होती. यानंतर बदललेल्या पे-स्ट्रक्चर नुसार महिला खेळाडूंना २० हजार रुपये मिळणार आहेत.

जास्तीचा वन-डे, टी-२० सामना खेळण्यास तयार पण…England विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यावर गांगुलीचं वक्तव्य

    follow whatsapp