Khel Ratna Award : बीसीसीआयकडून मिथाली राज, रविचंद्रन आश्विनच्या नावाची शिफारस

बीसीसीआयने राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने यंदाच्या वर्षी रविचंद्रन आश्विन आणि मिथाली राज यांच्या नावाची शिफारस करण्याचं ठरवलं आहे. याव्यतिरीक्त लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२१ साठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यासाठीच्या तारेखत मुदतवाढ दिली आहे. याआधी २१ […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:24 AM • 30 Jun 2021

follow google news

बीसीसीआयने राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने यंदाच्या वर्षी रविचंद्रन आश्विन आणि मिथाली राज यांच्या नावाची शिफारस करण्याचं ठरवलं आहे. याव्यतिरीक्त लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे.

हे वाचलं का?

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२१ साठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यासाठीच्या तारेखत मुदतवाढ दिली आहे. याआधी २१ जून ही शेवटची तारीख होती. राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार अशा दोन पुरस्कारांसाठी क्रीडा संघटनांना आपल्या खेळाडूंच्या नावाची शिफारस करायची असते.

ANI शी बोलत असताना BCCI मधील सूत्रांनी याविषयी महत्वाची माहिती दिली. “आम्ही विस्तृत चर्चा केल्यानंतर आश्विन आणि मिथाली राजचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवायचं ठरवलं आहे. धवन-बुमराह आणि लोकेश राहुलचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवलं जाणार आहे.” मागच्या वर्षी मनिका बत्रा (टेबल टेनिस), रोहित शर्मा (क्रिकेट), विनेश फोगट (कुस्ती), राणी रामपाल (हॉकी), पी. मरिअप्पन (Athletics) यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एकाच वेळी पाच खेळाडूंना हा पुरस्कार देण्याची ती पहिलीच वेळ होती.

क्रिकेटव्यतिरीक्त अन्य क्रीडा संघटनांनी आतापर्यंत शिफारस केलेल्या खेळाडूंची नावं –

  • द्युती चंद – खेल रत्न पुरस्कार (ओडीशा सरकार)

  • अंकिता रैना, प्रजनेश गुणेश्वरन – अर्जुन पुरस्कार (ऑल इंडिया टेनिस असोसिएशन)

  • सुनील छेत्री – खेल रत्न पुरस्कार (अखिल भारतीय फुटबॉल महासंघ)

  • अंकुर मित्तल, अंजुम मुद्गील – खेल रत्न पुरस्कार (नॅशनल रायफल असोसिएशन)

  • मुसा शेरीफ – मोटारस्पोर्ट्स ड्रायव्हर (FMSCI)

  • रवी दाहिया, दीपक पुनिया – अर्जुन पुरस्कार (कुस्ती महासंघ)

    follow whatsapp