महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धेचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार असं दिसतंय. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठीच्या आयपीएल स्पर्धेची चर्चा सुरु होती. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या पार पडलेल्या बैठकीत महिलांसाठीची आयपीएल स्पर्धा कशी पार पडेल यावर चर्चा झाल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
भारतीय महिला क्रिकेटपटूंना मोठ्या पातळीवर प्राधान्य मिळावं यासाठी बीसीसीआय गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा भरवण्याच्या तयारीत आहे. “महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धेवर आम्ही काम करत आहोत आणि पुढील वर्षापासून ही स्पर्धा सुरु होऊ शकते. किती संघांना यात सहभाग देता येईल, कोणत्या कालावधीत हे सामने खेळवता येतील याच्यावर आमचं काम सुरु आहे. आता आम्ही सर्वच गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतू आताच काही संघांनी महिला आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे”, BCCI मधील सूत्रांनी ANI ला माहिती दिली.
IPL मध्ये कोरोनाची एंट्री, दिल्ली कॅपिटल्समध्ये तीन केसेस पॉझिटिव्ह
सुरुवातीला बीसीसीआय सहा संघांनिशी ही स्पर्धा सुरु करण्याच्या तयारीत असून यासाठीचा लिलाव आणि इतर गोष्टींवर काम सुरु झाल्याचं कळतंय. “हे पाहा, आता सर्वकाही गोष्टी कागदावर असून त्याला प्रत्यक्षात येण्यासाठी बराच वेळ लागेल कारण यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या आम्ही आखलेल्या प्लाननुसार नवीन वर्षात साधारण ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा सुरु करण्याचा आमचा विचार आहे. या सर्व गोष्टींवर चर्चा झाली की गव्हर्निंग काऊन्सीलचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर याबद्दलची अधिकृत घोषणा केली जाईल”, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.
उमरान मलिकची हवा, 20 वी ओव्हर मेडन टाकत दिग्गज बॉलर्सशी बरोबरी
ADVERTISEMENT
