CT 2025: BCCI ने उचललं कठोर पाऊल, गौतम गंभीरच्या पीएला थेट...

Gautam Gambhir PA News: गौतम गंभीरच्या वैयक्तिक सहाय्यकावरून (पीए) सध्या बराच वाद सुरू आहे. ज्याबबात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

BCCI ने उचललं कठोर पाऊल, गौतम गंभीरच्या पीएला थेट...

BCCI ने उचललं कठोर पाऊल, गौतम गंभीरच्या पीएला थेट...

मुंबई तक

• 11:35 AM • 14 Feb 2025

follow google news

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 10 कलमी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. जे अलिकडच्या इंग्लंड मालिकेत दिसून आले. आता 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान कोणत्याही परदेश दौऱ्यात हे पाळले जाईल.

हे वाचलं का?

या 10 मार्गदर्शक तत्त्वांबद्दल बीसीसीआय किती गंभीर आहे याचे सर्वात मोठे उदाहरण खाजगी कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेवरून दिसून येते. ऑस्ट्रेलियात गंभीरसोबत राहिल्यामुळे बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करणाऱ्या भारतीय संघाचे प्रमुख गौतम गंभीर यांच्या वैयक्तिक सहाय्यकाला (PA) आता  खेळाडूंसोबत एकाच हॉटेलमध्ये राहू नये असे सांगण्यात आले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, प्रशिक्षक स्टाफमधील एका सदस्याचे वैयक्तिक सचिव (पीए), जे नियमितपणे टीम हॉटेलमध्ये राहत होते, ते आता वेगळ्या सुविधेत राहत आहेत.

अहवालात गौतम गंभीरचे नाव नसले तरी, भारतीय प्रशिक्षक स्टाफमधील कोणत्याही सदस्याचा (मुख्य प्रशिक्षक वगळता) संघासोबत प्रवास करणारा पीए नाही. शिवाय, प्रत्येक महत्त्वाच्या टीम मीटिंगमध्ये गंभीरच्या पीएची उपस्थिती यावर ऑस्ट्रेलियातील बीसीसीआय अधिकाऱ्यांना नाराजी व्यक्त केली होती.

एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले - त्यांचा पीए राष्ट्रीय निवडकर्त्यांसाठी राखीव असलेल्या गाडीत का बसला होता? ते गाडीतील कोणत्याही अज्ञात तिसऱ्या व्यक्तीशी खाजगी चर्चाही करू शकत नाहीत. त्याला अॅडलेडमधील बीसीसीआय हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये जागा का देण्यात आली होती?

अधिकाऱ्याने असेही म्हटले की, पंचतारांकित हॉटेलच्या परिसरात पीएने नाश्ता कसा केला? जो फक्त संघ सदस्यांसाठी राखीव आहे.

इंग्लंड मालिकेत झपाट्याने बदल

इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत परिस्थिती झपाट्याने बदलली. गंभीरचा पीए भारताच्या सामन्यांच्या ठिकाणी उपस्थित होता पण तो खेळाडू आणि अधिकृत कार्यक्रमांपासून दूर राहिला आणि आता तो वेगळ्या हॉटेलमध्ये राहत आहे. हा बीसीसीआयच्या आदेशाचा थेट परिणाम आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळाडूंसोबत कुटुंब नाही

भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्टार खेळाडूंनी (रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल) बीसीसीआयच्या कडक सूचनांनुसार रणजी करंडक सामन्यांसाठी स्वतःला उपलब्ध करून दिल्यानंतर, आता बोर्डाने खेळाडूंना परदेश प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून दिली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान काही मार्गदर्शक तत्त्वे आधीच लागू करण्यात आली असली तरी, संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे चॅम्पियन्स ट्रॉफीपासून पूर्णपणे लागू केली जातील. कारण बीसीसीआयने मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर भारताचा हा पहिलाच परदेश दौरा असेल.

गेल्या काही परदेश दौऱ्यांमध्ये, ज्यामध्ये आयसीसी स्पर्धांचा समावेश होता, अनेक अव्वल क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबीयांसह तिथे गेले होते पण आता तसे होणार नाही.

दौऱ्याचा कालावधी तीन आठवड्यांपेक्षा थोडा जास्त आहे हे लक्षात घेता. अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. अशावेळी बीसीसीआय खेळाडूंना त्यांचे कुटुंबीय दौऱ्यावर घेऊन जाण्यास परवानगी देणार नाही. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 45 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीच्या दौऱ्यात कुटुंबे जास्तीत जास्त दोन आठवडे खेळाडूंसोबत राहू शकतात.

नियम प्रत्येक खेळाडूसाठी सारखेच असतात...

कोणताही खेळाडू हा अपवाद नाही. तथापि, खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांना स्वखर्चाने सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यावी की नाही यावर बोर्ड अजूनही विचार करत आहे.

संघ आणि प्रशिक्षक गटासोबत पूर्वी असलेल्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांवर (व्यवस्थापक, एजंट, शेफ) देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. काही खेळाडूंच्या विशेष आहाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय काही शेफला बोलावण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जाते.

    follow whatsapp