Astrology : शनिने मीन राशीत प्रवेश केला आहे. काही राशींसाठी हा बदल अगदी शुभ मानला जात आहे. शनीची हालचाल ही मंद गतीने होत आहे. त्यामुळे शनि हा अडीच वर्षे एकाच राशीत वास्तव्य करतो. अर्थातच शनि 2027 पर्यंत काही राशींमध्ये वास्तव्य करणार आहे. यामुळे अशा राशींना शनिच्या वास्तव्याने संपत्ती, यश आणि समृद्धी प्राप्त होईल. अशातच जाणून घेऊयात शनिच्या वास्तव्याने कोणत्या राशींना कसा फायदा होईल.
हेही वाचा : कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पाऊस घालणार धुमाकूळ! 'या' ठिकाणी घोंगावणार वादळी वारे
ADVERTISEMENT
मीन राशीचा विचार केल्यास ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्च 2025 रोजी रात्री 11.1 वाजता शनीने मीन राशीत प्रवेश केला. शनि हा 2027 पर्यंत मीन राशीत सकारात्मक भावना घेऊन प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीसाठी पैसे, करिअर आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल घडून येऊ शकतो.
मीननंतर आता मिथुन राशीत शनीचे भ्रमण हे दहाव्या घरात होईल. हा करिअर आणि आदरभावाचा प्रश्न आहे. मीन राशींच्या लोकांना नोकरीद पदोन्नती मिळू शकते. नोकरदार वर्गातील कर्मचाऱ्यांची पगारवाढ होते. तसेच व्यवसायात नवीन संधी प्राप्त होते. जुन्या गुंतवणुकीतून आपल्याला चांगला नफा प्राप्त होतो. सध्या सुरू असणारा काळ हा कठोर आणि अथक परिश्रमांचा असणार आहे.
मिथुननंतर आता तूळ राशीत ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सहाव्या स्थानी आहे. यामुळे शत्रूपासून सावधानता बाळगणे आणि आरोग्याची काळजी घ्यावी असं सांगत आहे. तूळ राशीतील लोक हे त्यांच्या विरोधकांवर विजय मिळवतील. नोकरी करणाऱ्या सहकाऱ्यांना सहकार्य मिळेल. तसेच व्यवसाय क्षेत्रातील व्यवसायिकांना लाभ मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामं पूर्ण होतील. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
हेही वाचा : शिवराज दिवटे मारहाणप्रकरणात 'बीड बंद'ची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
दरम्यान शनि या वरील राशींमध्ये वास्तव्य करत आहे. यासाठी वरील तिन्ही राशींच्या लोकांनी शनिला प्रसन्न ठेवण्याचे प्रयत्न करावे. त्यासाठी शनिला काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करावे. हनुमान चालीसा पठण करावी. गरीबांना अन्नदान करावे. सकारात्मक विचार करत कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
