गोकूळ कांबळे, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर आज (19 मे) पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान एक अत्यंत भीषण अपघात झाला. खेडजवळील जगबुडी नदीत कार कोसळल्याने कारमधील तब्बल 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचा चालक हा गंभीर जखमी झाला आहे. कारमधील सर्व लोक मीरा रोडहून रत्नागिरीतील देवरुख येथे एका अंत्यसंस्कारासाठी जात होते. त्याचवेळी अपघात होऊन 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट कोरड्या नदीपात्रात जाऊन कोसळली.
हे ही वाचा>> इंजिनिअर तरुणीनं आता गार्डसोबत केला कांड! बकरीवाला, Food डिलिव्हरी, भेळपुरीवाला..कोणालाच सोडलं नाही!
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांची गर्दी जमली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
एका अधिकाऱ्याने या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, खेडजवळ पहाटे 5.45 वाजता हा अपघात झाला. आधी गाडी दुभाजकाला धडकली आणि नंतर कोरड्या जगबुडी नदीत पडली. नदीपात्र कोरडं असल्याने कार थेट पात्रातील मोठ्या दगडांवर जाऊन आदळली. त्यामुळे अपघाताची तीव्रता अधिक वाढली आणि 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात तीन महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे जखमी झाले आहे.
अपघातातील मृतांची नावं
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मिताली विवेक मोरे (वय 43 वर्ष), मेघा पराडकर (वय 22 वर्ष), सौरभ पराडकर ( वय 22 वर्ष), निहार मोरे (वय 19 वर्ष) आणि श्रेयस सावंत (वय 23 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा>> कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पाऊस घालणार धुमाकूळ! 'या' ठिकाणी घोंगावणार वादळी वारे
अंत्यसंस्काराला चाललेल्या कुटुंबावरच काळाचा घाला
हे सगळं कुटुंब मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालं होतं त्याच वेळेला निष्ठुर नियतीने डाव साधला आहे. दोन्ही कुटुंबे मिरा रोड येथून रात्री साडेअकराच्या सुमारास गावी देवरूख येथे जाण्यास निघाले होते. त्यांच्या स्वत:च्या KIA कारने हे कुटुंब निघालं होतं. याच कारचा भीषण अपघात झाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हलविण्यात आलं आहे. तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. ज्यांना खेड येथून पुढील उपचाराकरिता पुढे पाठविण्यात आलं आहे.
अपघात स्थळी संरक्षण भिंत घालण्याची मागणी
दरम्यान, ज्या ठिकाणी अपघात झाला ते अपघातग्रस्त ठिकाण असून तिथे वारंवार भीषण अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्यात यावी अशी मागणी ही सातत्याने स्थानिकांकडून करण्यात येत आहे. ज्यासाठी अनेक वेळा आंदोलने देखील करण्यात आली आहेत. पण त्यानंतरही हायवे प्रशासनाचा कारभार ढिम्मच असल्याचं दिसून आलं. जामुळे आज पुन्हा एकदा 5 निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ज्यासाठी प्रशासनाचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे.
ADVERTISEMENT
