Astrology 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशीतील बदलांचा इतर राशींवर मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येतो. येत्या 23 मे रोजी, सर्व ग्रहांमध्ये अधिपती मानल्या जाणाऱ्यांमध्ये बुध, मेष या दोन्ही राशी सोडून शुक्र वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. बुधाच्या या संक्रमाणामुळे काही राशींत चांगले दिवस येऊ घातले आहेत. ज्यात विशेष म्हणजे तीन राशींचा समावेश आहे. त्या राशींना यश आणि आर्थिक लाभ मिळणार आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ज्योती मल्होत्राची महिना कमाई किती? तिच्या कृत्याने पोटावर येणार पाय?
बुध या ग्रहला व्यवसाय, संपत्ती आणि बुद्धीमत्ता प्राप्त असते. अशा परिस्थितीत, वृषभ राशीत बुधाचे आगमन हे क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडवून आणू शकतात. दरम्यान त्या तीन राशी कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात.
सिंह
तीन राशींपैकी पहिली सिंह रास आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी, बुध राशीचा वृषभ राशीत प्रवेश करणे फायदेशीर आहे. तुमच्या कारकिर्दीत आणि तुमच्या सन्मानात प्रगती होणार आहे. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
तर दुसरी मिथुन रास असून ज्यात लोकांसाठी बुध ग्रहाचा वृषभमध्ये प्रवेश करणे म्हणजे शुभ मानले जात आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. मात्र, आरोग्याबाबत काहीअंशी चिंता भेडसावेल. आपण आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले काम सुरळीत होईल. एखाद्याला पैशांची मदत करताना अनेकदा विचार करावा. व्यवसायात नफा मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरदारांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे.
हेही वाचा : पाकिस्तानच्या अधिकाऱ्यासोबत जेवण, भारताविरुद्ध कट रचणाऱ्या कर्मचाऱ्याशी..., ज्योती मल्होत्राविषयी मोठा गौप्यस्फोट
कुंभ
दरम्यान, तिसरी रास ही कुंभ रास आहे. बुध रास ही वृषभ राशीत प्रवेश करण्यास सकारात्मक परिस्थिती असणार आहे. यामुळे भौतिक सुखाचा आनंद घेता येईल. घराचे काम दुरूस्त करण्याचा उत्तम काळ आहे. तसेच एखादा व्यवसाय सुरु केल्यास नक्कीच यश मिळेल. नोकरदार वर्गासाठीही सकारात्मक परिस्थिती असणार आहे.
ADVERTISEMENT
