"...तर आम्ही नरकात जाऊ, पण पाकिस्तान नको", जावेद अख्तर का म्हणाले?

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:52 AM • 18 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

जावेद अख्तर पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?

point

संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातलं वक्तव्य

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत झालं. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना अख्तर म्हणाले, "जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एक निवडायचे असेल, तर मी नरकाला प्राधान्य देईन."

हे वाचलं का?

हे ही वाचा >> कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळ धडकणार! 'या' भागात कोसळणार पावसाच्या सरी

जावेद अख्तर यांना धार्मिक कट्टरपंथी गटांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, "मला दोन्ही बाजूंनी शिव्या मिळतात. काहीजण मला 'काफिर' म्हणून नरकात जाण्याची धमकी देतात, तर काहीजण 'जिहादी' ठरवून पाकिस्तानला पाठवण्याची भाषा करतात. जर मला या दोन्हीपैकी एक निवडायचं असेल, तर मी नरकच निवडेन." या वक्तव्यातून त्यांनी कट्टरपंथींच्या टीकेवर उपहासात्मक पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. तसंच सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान संघर्षावरूनही त्यांनी आपण पाकिस्तानच्या किती विरोधात आहोत हे दाखवून दिलं. 

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलताना जावेद अख्तर यांनी सांगितलं की, सार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तीला समर्थनाबरोबरच टीकेलाही सामोरे जावं लागतं. "मी दोन्ही बाजूंनी बोलतो, त्यामुळे दोन्ही बाजूंनी नाराज होतात. माझे व्हॉट्सअॅप आणि ट्विटर पाहिले, तर दोन्ही बाजूंनी मिळणाऱ्या शिव्यांची यादी दिसेल. काही लोक कौतुकही करतात, पण कट्टरपंथींकडून मला सतत टीका सहन करावी लागते. जर एका बाजूने टीका थांबली, तर मला वाटेल की मी काहीतरी चूक करतोय," असंही ते म्हणाले.

हे ही वाचा >> "आम्ही त्या पंथातले लोक..आम्ही वाकणार नाही...", 'नरकातला स्वर्ग' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संजय राऊतांची तोफ धडाडली

जावेद अख्तर हे सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. मार्च 2010 ते मार्च 2016 या काळात ते तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नियुक्त केलेले राज्यसभेचे खासदारही होते. अख्तर यांच्या या वक्तव्यानं सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलं असून, यावर आता जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

    follow whatsapp