Jyoti Malhotra Income : पाकिस्तानला हेरगिरीच्या माध्यमातून मदत करणारी ज्योती मल्होत्रा चर्चेत आली आहे. तिचे सोशल मीडियावरती तिचे 1.31 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच तिचे एक युट्यूब चॅनल असून 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचा व्लॉगही आहे. सोशल मीडियावर तिने आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तच्याकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. तिने अनेक कंपन्यांशी, संस्थांशी व्यवसायिकदृष्ट्या डील केलेलं आहे. मात्र, त्याचा परिणाम हा फॉलोअर्सवर तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : पाकिस्तानच्या अधिकाऱ्यासोबत जेवण, भारताविरुद्ध कट रचणाऱ्या कर्मचाऱ्याशी..., ज्योती मल्होत्राविषयी मोठा गौप्यस्फोट
ADVERTISEMENT
ज्योती मल्होत्राच्या पोटावर पाय?
भारत पाकिस्तान तणावजन्य परिस्थिती सध्या थंडावली आहे. मात्र, ज्योती मल्होत्रा नावाच्या हरियणातील तरुणीच्या कृत्याने अनेक भारतीयांना हादरवून टाकलं आहे. तिचे पाकिस्तानी गुप्तहेरांशी संबंध असल्याच्या चर्चा आता समोर आल्या आहेत. यामुळे ज्योती मल्होत्राच्या पोटावर पाय येण्याची चिन्हे समोर आली आहेत.
ज्योती मल्होत्राच्या युट्यूब चॅनेलला 3 लाखांहून अधिक सबस्क्राईब
ज्योती मल्होत्रा ही एका चांगली युट्यूबर आहे. तिचे युट्यूबला 3 लाखांहून अधिक लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने तिला पैसा कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. ज्योती ही जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावते.
ज्यात प्रत्येकी 1000 व्ह्यूजसाठी 1-3 डॉलर म्हणजे 80 - 240 रुपये कमाई होते. ज्योतीने इतर डीलमधून आणि बँड कंपन्यांमधून पैसे कमावले आहेत. जसे की ज्यात ट्रॅव्हल व्लॉगर्सना ट्रॅव्हल गियर, हॉटेल्स एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल्स अॅप्स अशा इतर अनेक ब्रँडकडून पैसे मिळतात. तिचे सोशल मीडिया आणि तिच्या एकूण प्रभावशाली व्यक्तीमत्वासाठी ती 20 ते 50 हजार रुपये आकारू शकते.
हेही वाचा : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळ धडकणार! 'या' भागात कोसळणार पावसाच्या सरी
एका अंदाजानुसार, ज्योतीचे एकूण मासिक वेतन हे 80 हजार असेल. व्हिडिओला किती व्ह्यूज आलेत. त्यावरून इतर कंपनी आणि ब्रँड याचा विचार करूनच डील करत असते. दरम्यान, कमाईसोबतच अनेकदा व्लॉग बनवत असताना अनेकदा खर्चही होते. त्यात आवश्यक तांत्रिक उपकरणे जसे की, कॅमेरा, ट्रायपॉड आणि इतर अनेक गोष्टींचा या उपकरणात समावेश असतो. त्यात पैसे खर्च होतात.
ADVERTISEMENT
