पाकिस्तानच्या अधिकाऱ्यासोबत जेवण, भारताविरुद्ध कट रचणाऱ्या कर्मचाऱ्याशी..., ज्योती मल्होत्राविषयी मोठा गौप्यस्फोट
Jyoti Malhotra : पाकिस्तानातील अधिकाऱ्याने ज्योती मल्होत्राला जेवणासाठी आमंत्रित केलं होते. अशी माहिती आज तक या वृत्तमाध्यमाने दिली आहे. याची माहिती या वृत्तात नमूद केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 ज्योती मल्होत्रा आहे तरी कोण?
 
 पाकिस्तानातील अधिकाऱ्याने ज्योती मल्होत्राला जेवणासाठी आमंत्रित केलं होते.
 
 ज्योती मल्होत्रा पाकिस्तानची गुप्तहेर कशी झाली?
Jyoti Malhotra : भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हल्ले केले. त्यानंतर आत पाकिस्तानला मदत करणाऱ्या हरियाणातील एका तरुणीने हेरगिरी केली आहे. एवढंच नाहीतर पाकिस्तानमधील एका अधिकाऱ्याने तिला जेवणासाठी बोलावलं होते अशी माहिती समोर येताना दिसते. अशातच तिला शनिवारी 17 मे 2025 दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ती इतर दुसरी कोणीही नसून शनिवारपासून चर्चेत आलेली ज्योती मल्होत्रा आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्याने ज्योतीला जेवणासाठी केलं आमंत्रित
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असणाऱ्या पाकिस्तानी अधिकारी दानिशने ज्योतीला जेवणासाठी आमंत्रण दिले होते. यादरम्यान दोघांमध्येही संवाद झाला. याचा व्हिडिओ ज्योती मल्होत्राने सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यासोबत तिची ओळख करून दिली, अशी माहिती आता समोर आली आहे.
दरम्यान, ज्योतीने सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, स्नॅपचाट, जट्ट रंधावा या नावाने सेव्ह करण्यात आलेल्या गुप्तचर शाकीर उर्फ राणा शाहबाजशी संवाद साधला होता. यामुळेच आता ज्योती मल्होत्रावर भारतीय न्याय संहिताच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी तिचा लेखी जबाब घेण्यात आला आहे. हे प्रकरण हिसारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपण्यात आले.
भारताविरूद्ध कटकारस्थान रचणाऱ्या दानिशचा हात
दानिश हा भारताविरुद्ध कटकारस्थान रचण्याचं काम करत होता. हे प्रकरण अधिकच गंभीर असल्याने सुरक्षा यंत्रणांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता न्यायालयात हजर झाल्यानंतर पोलिसांना पाच दिवसांचा वेळ मिळाला आहे. यामुळे पोलिसांना ज्योती मल्होत्राकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेता येईल.














