संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईमध्ये झालं. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार साकेत गोखले आणि संजय राऊतांसोबत आणखी एका व्यक्तिने उपस्थितांशी संवाद साधला. ती व्यक्ती म्हणजे न्यू इरा पब्लिकेशनचे शरद तांदळे. शरद तांदेळे यांच्या या न्यू इरा पब्लिकेशनच्या माध्यमातूनच नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
म्हणून पुस्तक छापण्याची हिंमत...
संजय राऊत यांचं समकालीन राजकारणातील स्थान, त्यांची आजवरची राजकीय भूमिका, ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा यावरुन हे पुस्तक प्रकाशित करणं ही सुद्धा राजकीय जोखीम असू शकत होती. मात्र, आपण यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे वाचले आहेत, त्यामुळे ही हिंमत आपल्यात सहजच आली असं शरद तांदळे म्हणाले आहेत. शरद तांदळे यांची कारकीर्द यापूर्वीही विशेष राहिली आहे. त्यांनी लिहिलेल्या रावण-राजा राक्षसांचा, द आंत्रप्रेन्युअर ही पुस्तकं ही पुस्तकही चांगलीच चर्चेत होती. शरद तांदळे यांनी या कार्यक्रमात केलेलं भाषण सध्या चांगलंच गाजतंय.
हे ही वाचा >> "आम्ही त्या पंथातले लोक..आम्ही वाकणार नाही...", 'नरकातला स्वर्ग' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संजय राऊतांची तोफ धडाडली
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील वंजारवाडी या छोट्या गावातून सुरुवात करून पुणे आणि लंडनपर्यंत शरद तांदळे पोहोचले. ते एक उद्योजक, लेखक, आणि प्रेरणादायी वक्ते आहेत. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1985 रोजी झाला. त्यांचे आई-वडील दोघंही जिल्हा परिषदेत शिक्षक होते, त्यामुळे शिक्षणावर त्यांचा विशेष भर होता. शरद तांदळे यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून उद्योजकता आणि लेखन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या खास वकृत्वामुळे तरुणांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे.
बीडचा जन्म, लंडनमध्ये पुरस्कार
शरद तांदेळेंनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केलं. त्यांना विज्ञान विषयाची आवड होती, त्यामुळे त्यांनी ११वी आणि १२वी विज्ञान शाखेतून सावरकर विद्यालय आणि बलभीम कॉलेज, बीड येथून पूर्ण केली.
हे ही वाचा >> "...तर आम्ही नरकात जाऊ, पण पाकिस्तान नको", जावेद अख्तर का म्हणाले?
पुढे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) मध्ये पदवी घेतली. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती, पण त्यांचा कल उद्योजकतेकडे अधिक होता.
शिक्षणानंतर शरद यांनी अनेक नवीन प्रयोग केले, परंतु त्यांना सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला. कर्ज घेऊन केलेल्या प्रयोगांमुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. शरद तांदळे यांनी पुण्यात येऊन नोकरी केली आणि त्याचवेळी उद्योजकतेची स्वप्ने पाहिली. त्यांनी ‘इनोव्हेशन इंजिनीअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स’ नावाची कंपनी स्थापन केली. 2016 मध्ये शरद तांदळे यांना लंडन येथे इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते तरुण उद्योजकतेचा पुरस्कार मिळाला. हा त्यांच्या यशाचा मोठा टप्पा होता.
रावण राजा राक्षासांचा, द आंत्रप्रेन्युअर ही पुस्तकं प्रसिद्ध
शरद तांदळे यांनी लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कादंबरी लेखनाचा निर्णय घेतला आणि यातही यश मिळवलं. त्यांनी ‘रावण राक्षसांचा राजा’ आणि ‘द आंत्रप्रेन्युअर’ ही दोन पुस्तके लिहिली, जी लाखोंच्या संख्येने विकली गेली आहेत.
हे ही वाचा >> "टाका त्यांच्यावर धाडी..बसवा त्यांना सुद्धा जेलमध्ये..", राऊतांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे कडाडले!
‘द आंत्रप्रेन्युअर’ हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र आहे, यामध्ये त्यांनी आपल्या जीवनातील संघर्ष आणि यशाचं सगळी स्टोरी सांगितलीये.
‘रावण राक्षसांचा राजा’ ही कादंबरी त्यांनी संशोधन आणि संदर्भ तपासून लिहिली आहे. या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या.
हे पुस्तक मराठीसह तमिळ, हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अनुवादित झाली आहेत. शरद तांदळे यांनी स्वतःच आपली पुस्तके प्रकाशित केली आणि त्यांचे मार्केटिंगही स्वतः केलं. यातूनच त्यांनी
न्यू एरा पब्लिशिंग हाऊस नावाचं प्रकाशन गृह सुरू केलं. हे पब्लिकेशन हाऊस पुण्यात आहे. याच माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं.
ADVERTISEMENT
