"आम्ही त्या पंथातले लोक..आम्ही वाकणार नाही...", 'नरकातला स्वर्ग' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात संजय राऊतांची तोफ धडाडली

Sanjay Raut Latest Speech : जर मी अग्रलेख लिहितो, त्याची चर्चा होते. पुस्तक लिहिल्यानंतर व्हायलाच पाहिजे. संपादकीय लिहिल्यावर चर्चा तर होणारच.

Sanjay Raut Latest Speech

Sanjay Raut Latest Speech

मुंबई तक

• 09:59 PM • 17 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊतांचा 'नरकातला स्वर्ग' पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

point

"दोन दिवसापासून अनेकांना मिरच्या लागल्या..."

point

संजय राऊतांनी विरोधकांवरही साधला निशाणा

Sanjay Raut Latest Speech : जर मी अग्रलेख लिहितो, त्याची चर्चा होते. पुस्तक लिहिल्यानंतर व्हायलाच पाहिजे. संपादकीय लिहिल्यावर चर्चा तर होणारच. पण मी पुस्तक लिहिल्यावर त्याची चर्चा झाली नाही. मग लिहून उपयोग काय? दोन दिवसापासून अनेकांना मिरच्या लागल्या आहेत. पण जे लिहिलंय ते सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे माझी ओळख झाली. सत्य आणि नितिमत्ता या दोन गोष्टींची तू कास सोडू नकोस, हे जेव्हा बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं..ते मी शेवटपर्यंत पाळलं. जे सांगायचे तेही सांगा आणि जे तुम्ही बोलू शकत नाही..ते तुम्ही ठामपणे लिहा. आम्ही लिहिणारी माणसं आहोत. आम्ही बोलणारी माणसं सुद्धा आहोत, असं मोठं विधान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. ते त्यांच्या 'नरकारता स्वर्ग' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.  

हे वाचलं का?

संजय राऊत 'नरकातला स्वर्ग' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात काय म्हणाले?

"आम्ही त्या पंथातले लोक आहोत. आम्ही वाकणार नाही. साकेत वाकला नाही. संजय सिंग झुकला नाही. अनिल देशमुखही आहेत. आम्ही ठरवलं काहीही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही. आपण लढत राहायचं. कुणीतरी लढावच लागेल. पुस्तक जेव्हा तुरुंगात लिहियाचं ठरवलं, तेव्हा मी आमच्या देशमुखांनाही प्रेरणा दिली. वेळ घालवायचाय ना..जेलमध्ये एक मिनिट एका वर्षासारखं वाटतं. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता. एक छोटा दरवाजा असतो. तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुमचा जगाशी संबंध तुटतो", असंही राऊत म्हणाले.

हे ही वाचा >> "टाका त्यांच्यावर धाडी..बसवा त्यांना सुद्धा जेलमध्ये..", राऊतांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे कडाडले!

"एका मराठी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तुडुंब लोक जमले आहेत. मराठी साहित्य आजंही लोक वाचतात..ऐकतात..जावेद अख्तर यांच्यासारखी योग्य व्यक्ती आजच्या कार्यक्रमाला लाभली असती, असं मला वाटत नाही. ते नुसते कवी लेखक, पटकथाकार नाहीत. जिथे जिथे अन्याय होईल, देशात जिथे काही चुकीचं घडेल, तिथे जावेद साहेब सातत्यानं आपला आवाज उठवीत असतात. जावेद साहेबांचं इथे असणं हे आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. शरद पवार साहेब त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. ते ही पडद्यामागे अशा अनेक लढाया आमच्यासाठी लढत राहिले आणि समोरून लढत असतात", असं मोठं विधान संजय राऊत यांनी यावेळी केलं.

हे ही वाचा >> पाकिस्तानची गुप्तेहर.. 'ती' महिला पोलिसांच्या ताब्यात, कोण आहे ज्योती मल्होत्रा?

उद्धव साहेब..माझे सर्वोच्च नेते..मित्र आणि सदैव माझ्या पाठिशी ते उभे राहिले आणि खास पाहूणे म्हणून कोलकाता येथून बोलावले आहेत. त्यांचं नाव साकेत गोखले आहे. ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं. महाराष्ट्रातून त्यांना कोलकातासाठी एक लढवय्या हवा होता. आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की, मी त्यांच्यात माझी प्रतिकृती बघतो. ते ही ईडीच्या तुरुंगात होते. चक्रव्यूहात होते आणि मी सुद्धा होतो. साकेत गोखले तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार आणि लेखक आहेत. ते मुळचे मुंबईकर आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

    follow whatsapp