Astrology 2025 : जून महिन्यात भद्र आणि मालव्य असे दोन राजयोग एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे हा योग दुर्मिळ मानला जाईल. तर शुक्र हा वृषभ राशीत भ्रमण करेल. तसेच बुध हा मिथुन राशीमध्ये भ्रमण करत आहे. यामुळे आता काही राशींचे भाग्य आणि नशीब चमकणार आहे.
ADVERTISEMENT
तब्बल 100 वर्षानंतर असा योग घडत आहे की, जेव्हा दोन्ही राजयोग एकत्र येत आहेत. या शुभ योगांमुळे वैयक्तिक जीवनावरच नाहीतर देशपातळीवर आणि जागतिकपातळीवरील समाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम निर्माण होईल. यामुळे चांगले नशीब आणि यशही मिळणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यातील मिथुन, तूळ आणि मीन राशींचे योग चांगले निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आलेय.
हेही वाचा : बीडमध्ये आकाचा आणखी एक 'आका' तयार; तरुणाला जनावरासारखं सोललं, जीवाच्या आकांतानं...
मिथुन रास
मिथून राशीचा विचार केल्यास बाराव्या घरामध्ये निर्माण होणारा योग हा तुमच्यासाठी संपत्ती, किर्तीचा योग असल्याने यशाचे दरवाजे खुले होतील. मिथून राशीतील लोकांचा संवादही अधिकरित्या प्रभावी होण्याची चिन्हे आहेत. ज्याचा लोकांवरही प्रभाव निर्माण होईल. कलात्मक क्षेत्रामध्ये मिथून राशीच्या लोकांसमोर यश धावून येईल.
तूळ रास
तूळ राशीच्या नवव्या आणि आठव्या घरात ग्रहांचा प्रभाव दिसून येतोय. यामुळे आता तूळ राशीच्या लोकांचा व्यवसाय क्षेत्रात चांगले यश मिळेल. त्यांना व्यवसायातून अधिकचा नफा मिळू शकतो. तूळ राशीचे लोक आता परदेशात प्रवास करू शकतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल आणि समाजात तुमची मान उंचावलेली असेल.
हेही वाचा : मालव्य राजयोग... 'या' 4 राशींच्या लोकांचं नशीब खुलणार, होईल पैशांचा प्रचंड पाऊस!
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी मालमत्ता आणि वाहन खरेदी करणे सहज शक्य होईल. ज्यामुळे आपल्याला व्यवसायात नफा मिळवता येणार आहे. तसेच आपल्याला सरकारी कामामध्ये यश मिळवता येणार आहे. सामाजात मान सन्मानने वागणूक मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून चांगले पाठबळ मिळेल.
ADVERTISEMENT
