VIDEO : आयपीएलच्या मैदानात तुफान राडा,फॅन्स आपापसातच भिडले

मुंबई तक

30 Apr 2023 (अपडेटेड: 30 Apr 2023, 10:35 AM)

DC VS SRH Fight Viral Video : आयपीएलमधले अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये मैदानातच क्रिकेट फॅन्स आपापसातच भिडल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

fans fight with each other during delhi hyderabad match video viral

fans fight with each other during delhi hyderabad match video viral

follow google news

DC VS SRH Fight Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या आयपीएलमधल्या व्हिडिओची इंटरनेटवर क्रेझ आहे. आयपीएलमधले अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये मैदानातच क्रिकेट फॅन्स आपापसातच भिडल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (dc vs srh ipl 2023 fans fight with each other during delhi hyderabad match video viral)

हे वाचलं का?

शनिवारी 29 एप्रिल 2023 ला दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैद्राबादमध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्या दरम्यान काही क्रिकेट फॅन्स आपआपसात भिडल्याची घटना घडली आहे. लाथा-बुक्यांनी फॅन्स मारहाण करत आहे.अरूण जेटली स्टेडिअमवर ही घटना घडलीय. ही संपूर्ण घटना एका फॅन्सने मोबाईलच्या कॅमेरात कैद केली होती. त्यानंतर त्याने व्हिडिओ इंटरनेटवर टाकल्यानंतर व्हायरल झाला होता.

हे ही वाचा :  अजिंक्य रहाणेचं नशीब फळफळलं, थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येच संधी

व्हिडिओत काय?

अरूण जेटली स्टेडिअममधला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एक तरूण एका ग्रुपसोबत भांडताना दिसत आहे. सुरुवातीला शाब्दीक वाद होतात.त्यानंतर हा तरूण त्या तरूणांच्या ग्रुपला धक्का मारून पाडतो. याचा बदला घेण्यासाठी हे तरूण त्याच्या अंगावर जातात.यावेळी देखील तोच तरूण या सर्वांना मारतो. सध्या या मैदानातील मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असा रंगला सामना

सनराईजर्स है्द्राबादची पहिली बॅटींग होती. है्द्राबादकडून अभिषेकने 36 बॉलमध्ये 67 धावा आणि क्लासेनने 27 बॉलमध्ये 53 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर सनराईजर्स है्द्राबादने 6 विकेट गमावून 197 धावा ठोकल्या.198 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती. मिशेल मार्शने फिल साल्ट सोबत दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची पार्टनरशिप केली. पण तरीही दिल्ली 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 188 धावांपर्यंतच मजल मारू शकली. त्यामुळे हेद्राबादने 9 धावांनी दिल्लीची पराभव केला.

हे ही वाचा : ‘माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा’, धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

मार्शने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 4 विकेट घेतले, तर बॅटींगमध्ये त्याने 39 बॉलमध्ये 63 धावा केल्या. या खेळीत एक फोर आणि सिक्स होता. तर साल्टने 35 बॉलमध्ये 59 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने 14 बॉलमध्ये 1 फोर आणि सिक्स मारलाय. हैद्राबादने हा सामना जिंकून आठ सामन्यात तिसऱ्या विजयाची नोंद केली. तर दिल्लीची आठ सामन्यात सहावी हार आहे.

    follow whatsapp