दिल्लीत भारताचा डंका; तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रलियाचा केला 6 गडी राखून पराभव

Border- Gavaskar Test Series : दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केलं (India Won By 6 Wickets). या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे (India Lead 2-0 in Border Gavskar Series). भारताला विजयासाठी 115 धावांची गरज होती. भारताने तिसरा दिवस संपायच्या आधी हे लक्ष्य पूर्ण केले. भारताच्या फिरकी गोलंदाजासमोर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:49 AM • 19 Feb 2023

follow google news

Border- Gavaskar Test Series : दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केलं (India Won By 6 Wickets). या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे (India Lead 2-0 in Border Gavskar Series). भारताला विजयासाठी 115 धावांची गरज होती. भारताने तिसरा दिवस संपायच्या आधी हे लक्ष्य पूर्ण केले. भारताच्या फिरकी गोलंदाजासमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फारसे टीकू शकले नाही. (Indian Bowler Ravindra Jadeja) रविंद्र जदेजाने दुसऱ्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाचे 7 गडी बाद करुन या सामन्यात 10 बळी आपल्या नावावर केले. Ravindra Jadeja Took 10 Wickets in 2nd Match

हे वाचलं का?

Team India डोपिंगच्या विळख्यात? चेतन शर्मांच्या स्टिंगमुळे उडाली खळबळ

टॉस जिंकून ऑस्टेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या इंनिंगमध्ये 263 धावा काढल्या. खॉजाने 80 तर हँड्सकाँबने 72 धावांची खेळी केली. भारताकडून शमीने 4 तर जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 3 गडी बाद केले. नंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने 262 धावा काढल्या. भारताकडून अक्षर पटेलने 74 तर आर.अश्विनने 37 धावा केल्या. भारताचे एकावेळी 150 धावांवर 7 गडी बाद झाले होते. त्यानंतर अक्षर पटेल आणि अश्विनने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि योग्यरित्या पेलली देखील. दोघांनी 114 धावांची भागीदारी करत भारताला वापस आणलं.

जडेजाने 10 गडी बाद केले

दुसऱ्या इंनिंगमध्ये लिडसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजांना भारतीय फिरकी गोलंदाजांनी टीकू दिलं नाही. ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम 113 धावांवर गुंडाळली. पहायला गेलं तर ऑस्ट्रेलियाचे शेवटचे 9 विकेट्स अवघ्या 49 धावांवर गेले. ऑस्ट्रेलियाक़डून ट्रेविस हेडने 43 तर लाबूशेनने 35 धावांची खेळी केली. भारताकडून जडेजाने 7 तर अश्विनने 3 विकेट्स घेतले. जडेजाने संपूर्ण सामन्यात एकूण 10 गडी बाद केले.

Women’s IPL मध्ये Adani vs Ambani असा सामना पाहायला मिळणार, कसं?

भारताने 6 गडी राखून सामना जिंकला

भारताला जिंकण्यासाठी 115 धावांची गरज होती. या टारगेटला भारताने तिसऱ्या दिवशीच्या चहापाणाच्या आधीच पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्माने 20 चेंडूत 31 धावांची जलद खेळी केली. तर चोतेश्वर पुजाराने नाबाद 31धावांची खेळी केली. या विजयासह भारताने 4 सामन्याच्या बॉर्डर- गावस्कर मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली आहे. 10 गडी बाद करणाऱ्या रविंद्र जडेजाला सामनावीरचा पुरस्कार देण्याता आला.

    follow whatsapp