कसोटी प्रमाणे IPL ही रद्द होतं का ते पाहूया…इंग्लंडच्या माजी खेळाडूचा BCCI ला टोमणा

मुंबई तक

• 02:40 PM • 22 Sep 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातला अखेरचा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करावा लागल्यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये सध्या वाद सुरु आहेत. भारतीय गोटात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे खेळाडूंनी अखेरचा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. यावेळी काही इंग्लंडच्या खेळाडूंनी बीसीसीआयने IPL साठी अखेरचा कसोटी सामना रद्द केल्याची जाहीर टीका केली. युएईत आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर SRH च्या टी. नटराजनला कोरोना झाल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

भारत आणि इंग्लंड यांच्यातला अखेरचा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करावा लागल्यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये सध्या वाद सुरु आहेत. भारतीय गोटात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे खेळाडूंनी अखेरचा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. यावेळी काही इंग्लंडच्या खेळाडूंनी बीसीसीआयने IPL साठी अखेरचा कसोटी सामना रद्द केल्याची जाहीर टीका केली.

हे वाचलं का?

युएईत आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर SRH च्या टी. नटराजनला कोरोना झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने यावर आपली खोचक प्रतिक्रीया देत BCCI ला टोमणा मारला आहे.

धक्कादायक ! IPL च्या गोटात पुन्हा Corona चा शिरकाव, SRH च्या टी. नटराजनचा रिपोर्ट पॉजिटीव्ह

आता पाहूया कसोटी सामन्याप्रमाणे आयपीएल ही कॅन्सल होतेय का ते, मी पैज लावून सांगतो होणार नाही असं ट्विट मायकल वॉर्नने केलं आहे.

दरम्यान नटराजनच्या RT-PCR टेस्टचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर त्याने तात्काळ स्वतःला आयसोलेट केलं असून त्याच्यात कोविडची कोणतीही लक्षणं (asymptomatic) दिसून येत नाहीयेत. खबरदारीचा उपाय म्हणून नटराजनच्या संपर्कात आलेल्या संघातील सहा व्यक्तींनाही क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

IPL 2021 मध्ये पंजाबच्या खेळाडूकडून मॅच फिक्सींग? BCCI च्या अँटी करप्शन युनिटकडून तपासाला सुरुवात

जाणून घ्या, कोण आलं होतं नटराजनच्या संपर्कात?

१) विजय शंकर – (ऑलराऊंडर खेळाडू)

२) विजय कुमार – (टीम मॅनेजर)

३) श्याम सुंदर जे. – (फिजीओथेरपिस्ट)

४) अंजना वन्नन – (डॉक्टर)

५) तुषार खेडकर – (लॉजिस्टीक मॅनेजर)

६) पेरियसामी गणेशन – (नेट बॉलर)

खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संघातील खेळाडूंच्या चाचण्या करण्यात आला, याचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामन्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

जास्तीचा वन-डे, टी-२० सामना खेळण्यास तयार पण…England विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यावर गांगुलीचं वक्तव्य

    follow whatsapp