rahul chahar divorced wife ishani johar : भारतीय क्रिकेट संघाचा लेगस्पिनर Rahul Chahar आणि त्याची पत्नी ईशानी जौहर यांचा घटस्फोट झाला आहे. जवळपास चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 9 मार्च 2022 रोजी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगद्वारे त्यांनी विवाह केला होता.
ADVERTISEMENT
26 वर्षीय राहुलने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. कमी वयात लग्न केल्याची कबुली देत त्याने लिहिले की, त्या काळात त्याला स्वतःला आणि आयुष्याची दिशा पूर्णपणे समजली नव्हती. “मी कमी वयात लग्न केले. त्याआधी मी स्वतःला, माझी किंमत आणि मला घडवायचे असलेले आयुष्य पूर्णपणे समजून घेतले नव्हते. त्यानंतर अशी काही वर्षे आली ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. गेले पंधरा महिने कोर्टरूममध्ये गेले, जिथे संयम, ताकद आणि सत्याची ताकद काय असते? हे शिकायला मिळाली,” असे त्याने नमूद केले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुष्यातील हा अध्याय अधिकृतरीत्या संपल्याचे सांगताना राहुलने स्पष्ट केले की, तो हा निर्णय रागाने किंवा पश्चात्तापाने नव्हे तर स्पष्टतेने स्वीकारत आहे. “काही नाती कायमची नसतात; ती आपल्याला जागं करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी असतात. मी आता अधिक समजूतदार आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हा शेवट नाही, तर नवी सुरुवात आहे,” असेही त्याने पोस्टमध्ये लिहिले.
हेही वाचा : बीड : माजलगावच्या लॉजमधील 'त्या' खोलीत दुर्गंधी पसरली होती, दरवाजा उघडताच नको तेच... पुढे काय घडलं?
राहुल आणि ईशानी यांनी डिसेंबर 2019 मध्ये साखरपुडा केला होता. मात्र, कोरोनामुळे त्यांचा विवाह काही काळ लांबणीवर पडला आणि अखेर मार्च 2022 मध्ये गोव्यात विवाहसोहळा पार पडला.
कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास, राहुल चाहरने भारतासाठी 1 एकदिवसीय आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 18 च्या सरासरीने 3 विकेट्स घेतल्या आहेत, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 23.85 च्या सरासरीने 7 बळी घेतले आहेत. ICC T20 World Cup 2021 स्पर्धेत तो शेवटचा भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.
आयपीएलमध्ये 2026 हंगामात राहुल Chennai Super Kings संघाकडून खेळताना दिसणार आहे. मिनी लिलावात चेन्नईने त्याला 5.20 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले. यापूर्वी तो Rising Pune Supergiant, Mumbai Indians, Punjab Kings आणि Sunrisers Hyderabad या संघांकडूनही खेळला आहे. आतापर्यंत 79 आयपीएल सामन्यांत त्याने 28.66 च्या सरासरीने 75 विकेट्स घेतल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातून परतलेल्या जोडप्याचा किरकोळ कारणावरून वाद; पत्नीने फाशी घेतली, पतीनेही संपवलं आयुष्य
ADVERTISEMENT











