ICC WC Ind vs Aus: भारतासमोर मोठं आव्हान, ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ 5 खेळाडू ठरू शकतात घातक!

रोहिणी ठोंबरे

• 05:30 AM • 08 Oct 2023

भारतीय संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC World Cup) मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या खेळाची सुरुवात करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर (रविवार) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

The Indian team will start their game in the ICC Cricket World Cup 2023 (ICC World Cup) with a match against Australia. The match between India and Australia will be played on October 8 (Sunday) at the MA Chidambaram Stadium in Chennai.

The Indian team will start their game in the ICC Cricket World Cup 2023 (ICC World Cup) with a match against Australia. The match between India and Australia will be played on October 8 (Sunday) at the MA Chidambaram Stadium in Chennai.

follow google news

World Cup 2023 : भारतीय संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC World Cup) मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या खेळाची सुरुवात करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर (रविवार) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा ब्लॉकबस्टर सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल. (ICC India’s first World Cup match today Australia’s These 5 players can turn up the tension)

हे वाचलं का?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील या सामन्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियन संघ विक्रमी पाच वेळा विश्वविजेता आहे, तर भारताने दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. तसं पाहिलं तर, ऑस्ट्रेलियन संघात अशा खेळाडूंची फौज आहे, जी या महान सामन्यात टीम इंडियाचं टेन्शन वाढवू शकतात. अशा वेळी त्यांना भारताला झटपट बाद करावे लागेल किंवा विकेट घ्यावी लागेल. चला तर मग, भारतासाठी आव्हानात्मक ठरणाऱ्या अशा पाच खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Israel Palestine Crisis: इस्रायलमधील युद्धात बॉलिवूड अभिनेत्री बेपत्ता! सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ 5 खेळाडूंमुळे भारताचं टेन्शन वाढण्याची शक्यता!

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भारतात क्रिकेट खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी करत आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतही त्याने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली होती, त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल. वॉर्नरने आतापर्यंत भारताविरुद्धच्या 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51.04 च्या सरासरीने 1174 धावा केल्या आहेत.

स्टीव्ह स्मिथ

या सामन्यात भारतासाठी सर्वात मोठा धोका ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ असणार आहे. स्मिथने आतापर्यंत भारताविरुद्धच्या 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1260 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 54.78 इतकी आहे. एकदा स्मिथ क्रीजवर स्थिरावला की त्याला बाद करणे कठीण होऊन बसते. अशा वेळी स्मिथला सुरुवातीलाच पॅव्हेलियनमध्ये पाठवावे लागणार आहे.

’25 लोक पाकमधून आलेत, बॉम्बस्फोट करणार…’, मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या!

मिचेल स्टार्क

भारताला या वेगवान गोलंदाजाबाबत खूप सर्तकता बाळगावी लागणार आहे. स्टार्क मुख्यतः टीम इंडियाच्या सलामीवीर आणि स्टार फलंदाजांना लक्ष्य करतो. मिचेल स्टार्कने भारताविरुद्धच्या 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याने रोहित शर्माला तीनदा बाद केले. त्याने शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना 2-2 वेळा बाद केले आहे.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणला जातो. पॅट कमिन्सला नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कमिन्सने आतापर्यंत भारताविरुद्ध 19 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 26 बळी घेतले आहेत. तो टीम इंडियाचा ताण वाढवू शकतो.

Sharad Pawar: ‘…हे घटनात्मक पाप आहे’, पवार गटाचा राहुल नार्वेकरांवर मोठा आरोप

अ‍ॅडम झाम्पा

लेग-स्पिनर अ‍ॅडम झाम्पाही भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्यात पटाईत आहे. झाम्पाने भारताविरुद्धच्या 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 34 बळी घेतले आहेत. झाम्पाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला पाच वेळा बाद केले आहे. रोहित शर्मालाही त्याने चार वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. अशा वेळी भारताला झाम्पापासून सावध राहावे लागेल.

आतापर्यंत चेन्नई येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये कांगारू संघाने दोन आणि भारताने एक सामना जिंकला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 12 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने केवळ चार सामने जिंकले आहेत. म्हणजे आकडेवारीत ऑस्ट्रेलियन संघ आघाडीवर दिसतो.

    follow whatsapp