IND vs SL T20: ‘नो-बॉल टाकणं क्राइमच’, हार्दिक पांड्या प्रचंड भडकला

मुंबई तक

• 05:25 AM • 07 Jan 2023

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंकेविरुद्ध पुण्यात दुसरा T-20 सामना रंगला. या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी ही अत्यंत वाईट होती. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाच्या जबरदस्त खेळीसमोर भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. ज्यामुळे भारत 16 धावांनी पराभूत झाला. या सामन्यातील पराभवानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला व्हिलन ठरवलं जात आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी […]

Mumbaitak
follow google news

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंकेविरुद्ध पुण्यात दुसरा T-20 सामना रंगला. या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी ही अत्यंत वाईट होती. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाच्या जबरदस्त खेळीसमोर भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. ज्यामुळे भारत 16 धावांनी पराभूत झाला. या सामन्यातील पराभवानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला व्हिलन ठरवलं जात आहे.

हे वाचलं का?

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सध्या हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. पहिला सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या टी-20 सामन्यात जो पराभव स्वीकारावा लागला तो हार्दिक पांड्याचा प्रचंड जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने अर्शदीप सिंहला खडे बोल सुनावले आहेत.

रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांच्या गाडीचा भीषण अपघात

अर्शदीपमुळे पांड्याला राग अनावर

अर्शदीपची गोलंदाजीचं नेहमीच कौतुक केलं जातं. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपने केलेल्या गोलंदाजीवर चाहत्यांसह कर्णधार हार्दिक पांड्यानेही नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या T-20 सामन्यात अर्शदीपवरील नाराजीचे कारण म्हणजे, त्याने पाच नो-बॉल टाकले तर, दोन ओव्हरच्या स्पेलमध्ये 18.5 च्या सरासरीने त्याने तब्बल 37 धावा दिल्या. यामुळेच हार्दिक पांड्याही त्याच्यावर प्रचंड संतापला.

हार्दिकने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत अर्शदीपच्या नो-बॉलवर संताप व्यक्त केला. तो म्हणाला, ‘T20 सामन्यात नो-बॉल टाकणे हा एक प्रकारे गुन्हाच आहे. अर्शदीपने यापूर्वीही नो-बॉल टाकले आहेत. आम्ही बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये छोट्या-छोट्या चुका केल्या आहेत. क्रिकेटमध्ये चांगला-वाईट दिवस असतो पण, अगदी सरळसोप्या चुका करणं हे चुकीचे आहे. यासाठी याचे बेसिक नियम पाळणे फार गरजेचे आहे.’

सूर्यकुमारच्या आधी राहुल त्रिपाठीला का पाठवलं?

यानंतर सूर्यकुमारच्या आधी राहुल त्रिपाठीला का पाठवले असा सवाल हार्दिकला करण्यात आला. यावर पांड्या म्हणाला, ‘सूर्याने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली. संघात जो कोणी येईल, त्याच्याकडे अशी भूमिका द्यायची की, ज्यामुळे तो संघासाठी चांगली कामगिरी करेल.’

अर्शदीपच्या खेळीबरोबरच हार्दिक पांड्याच्या वर्तवणुकीची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, सामना संपण्यापूर्वीच, हार्दिक पांड्या डग आऊटमध्ये उपस्थित असलेल्या उर्वरित खेळाडूंशी हात मिळवतोय. पण हार्दिकची ही वर्तवणूक चाहत्यांना अजिबात आवडली नाही. यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे.

    follow whatsapp