Ind vs NZ : कानपूर मे आपका स्वागत है…गुटखा खाऊन मॅच पाहणारा चाहता सोशल मीडियावर व्हायरल

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना सध्या कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. या कसोटी मालिकेला बीसीसीआयने प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी अनुमती दिली आहे. भारताला पहिल्या डावात ३४५ धावांवर रोखल्यानंतर न्यूझीलंडनेही पहिल्या डावाची चांगली सुरुवात केली. परंतू या दरम्यान कानपूरच्या मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका अवलिया फॅनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. Ind […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:16 AM • 26 Nov 2021

follow google news

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना सध्या कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. या कसोटी मालिकेला बीसीसीआयने प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी अनुमती दिली आहे. भारताला पहिल्या डावात ३४५ धावांवर रोखल्यानंतर न्यूझीलंडनेही पहिल्या डावाची चांगली सुरुवात केली.

हे वाचलं का?

परंतू या दरम्यान कानपूरच्या मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या एका अवलिया फॅनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Ind vs NZ Test : …आणि श्रेयसने बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, पदार्पणाच्या कसोटीत खडूस शतकी खेळी

पहिल्या दिवसाचा खेळ सुरु असताना, कॅमेरामनची नजर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका फॅनकडे गेली. या व्हिडीओत दिसणारा व्यक्ती तोंडात गुटखा किंवा पान खाऊन बसल्याचं दिसत आहे. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर त्याच्यावर चांगलेच मिम्स तयार व्हायला लागले आहेत.

दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या खेळात श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर भारताने ३४५ धावांपर्यंत मजल मारली. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडनेही दमदार सुरुवात केली आहे. टॉम लॅथम आणि विल यंग या जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस यंग ७५ तर लॅथम ५० धावांवर खेळत होता.

    follow whatsapp