Ind vs Eng : अंपायरशी वाद घालणं भोवलं, Lokesh Rahul ला दंड

मुंबई तक

• 12:22 PM • 05 Sep 2021

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. अंपायरने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करुन वाद घातल्यामुळे लोकेश राहुलला दोषी ठरवण्यात आलं असून त्याच्या मानधनातली १५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ३४ व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. जेम्स अँडरसनच्या बॉलिंगवर लोकेश राहुल ४६ रन्स काढून आऊट झाला. […]

Mumbaitak
follow google news

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. अंपायरने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करुन वाद घातल्यामुळे लोकेश राहुलला दोषी ठरवण्यात आलं असून त्याच्या मानधनातली १५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ३४ व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला.

हे वाचलं का?

जेम्स अँडरसनच्या बॉलिंगवर लोकेश राहुल ४६ रन्स काढून आऊट झाला. यावेळी पंचांनी दिलेला निर्णय लोकेश राहुलला पटला नाही, ज्यामुळे त्याने वाद घातला. आयसीसीच्या Level 1 Code of Conduct चा भंग केल्याप्रकरणी राहुलवर ही कारवाई करण्यात आली.

याव्यतिरीक्त लोकेश राहुलच्या खात्यात एक Demerit Point जमा करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळातला राहुलचा हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत त्याने हा गुन्हा मान्य केला.

Ind vs Eng : Ravi Shastri यांच्यासह सपोर्ट स्टाफचे ३ सदस्य आयसोलेशनमध्ये, टीम इंडियाला मोठा धक्का

दरम्यान चौथ्या दिवशी पहिल्या सत्राअखेरीस भारताने ६ विकेट गमावत ३२९ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली, रविंद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे यांना आऊट करण्यात इंग्लंडच्या बॉलर्सना यश आलं.

    follow whatsapp