Ind Vs PaK: मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना सेहवागने सुनावलं; औवेसीही भडकले

मुंबई तक

• 11:01 AM • 25 Oct 2021

टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर अनेकांनी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल नाराजी केली व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवावरून गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल केलं जात आहे. शमीला ट्रोल करण्यावरून भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसह असदुद्दीने ओवैसी यांनी संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय […]

Mumbaitak
follow google news

टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर अनेकांनी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल नाराजी केली व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवावरून गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल केलं जात आहे. शमीला ट्रोल करण्यावरून भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसह असदुद्दीने ओवैसी यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजाना चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, नेटकऱ्यांनी मोहम्मद शमीला निशाणा बनवलं आहे. मोहम्मद शमीने पाकिस्तान विरुद्ध गोलंदाजी करताना 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही गडी त्याला बाद करता आला नाही.

या चार षटकात पाकिस्तानी फलंदाजांनी शमीला 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. खराब कामगिरी झाल्यामुळे शमीला लक्ष्य करत नेटकऱ्यांकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर करत ट्रोल केलं जात आहे. पाकिस्तानविरुद्ध हरल्याने शमीला मुस्लिम असल्यावरून ट्रोल केलं जात असून, भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

T20 WC, Ind Vs Pak: ‘रोहितला टीममधून ड्रॉप करणार?’, पत्रकाराच्या प्रश्नावर विराट भडकला अन् नंतर…

विरेंद्र सेहवाग काय म्हणतो…

‘मोहम्मद शमीवर ज्यापद्धतीने सोशल मीडियातून हल्ला केला आहे, तो धक्कादायक आहे. आम्ही मोहम्मद शमीसोबत आहोत. तो एक चॅम्पियन आहे आणि भारतीय संघाची टोपी घालतो. त्याच्या ह्रदयात भारत राहतो. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात खेळाचा करिष्मा दाखवून दे’, असं सेहवागने म्हटलं आहे.

T20 WC, India vs Pakistan: सोशल मीडियात कोहलीचं प्रचंड कौतुक, पाकिस्तानी बोर्डाने देखील केलं ट्वीट

ओमर अब्दुल्लांनी संघातील खेळाडूंना सुनावलं…

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही शमीला ट्रोल करण्यावरून ट्वीट केलं आहे. ‘मोहम्मद शमी त्या 11 खेळाडूंपैकी एक आहेत, जे काल रात्री पराभूत झाले. तो एकटाच मैदानात उतरलेला नव्हता. अशावेळी भारतीय संघातील खेळाडून जर आपल्या सहकारी खेळाडूच्या बाजीने उभे राहणार नसतील, त्यांचं गुडघ्यावर बसण्याला काही अर्थ नाही’, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

T20 WC, Ind Vs Pak: …अन् BCCI चे सचिव जय शाह उठून नाचायला लागले, Video व्हायरल

असदुद्दीने औवेसी काय म्हणाले?

एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही शमीला धर्मावरून ट्रोल करण्यात आल्यानंत संताप व्यक्त केला. ‘काल भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य करण्यात येत आहे. देशात द्वेष किती वाढला आहे, हेच यातून दिसून येत आहे. संघात ११ खेळाडू आहे आणि एका मुस्लिम खेळाडूला लोक लक्ष्य करत आहेत. हे कोण पसरवत आहे?’, असा सवाल ओवैसींनी केला आहे.

    follow whatsapp