मुंबई: Instagram वर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचं घाणेरडं चॅटिंग! अर्धनग्न होत VIDEO कॉल आणि नंतर...

अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दुष्कृत्य केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील एका खाजगी शाळेतील शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

teachers dirty chats with Student on Instagram Video call in half-naked state Case directly to the police

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

30 Jul 2025 (अपडेटेड: 31 Jul 2025, 09:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंस्टाग्रामवरुन विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे अश्लील कृत्य

point

अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल अन्...

point

पोलिसांनी शिक्षिकेविरोधात केला गुन्हा दाखल

Mumbai Crime: अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील एका खाजगी शाळेतील शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (29 जुलै) पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षिकेविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळी पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 11 आणि 12 (लैंगिक अत्याचार) अंतर्गत एफआयआर दाखल केली. 

हे वाचलं का?

रात्रभर विद्यार्थ्यासोबत अश्लील चॅटिंग

पीडित मुलाच्या वडिलांनी कोपरखैरने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता हे प्रकरण उघडकीस आलं. 35 वर्षीय आरोपी शिक्षिका रविवारी (27 जुलै) संध्याकाळपासून ते सोमवार सकाळपर्यंत इंस्टाग्राम अकाउंटवर विद्यार्थ्याशी म्हणजेच आपल्या मुलासोबत अश्लील चॅटिंग करत राहिल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला.

हे ही वाचा: 65 वर्षीय वृद्धाचं मतिमंद तरुणीसोबत घृणास्पद कृत्य! चौकात विवस्त्र अवस्थेत... CCTV मध्ये काय दिसलं?

चॅटचा स्क्रीनशॉटही पोलिसांकडे...

संबंधित महिला शिक्षिकेवर पीडित मुलासोबत प्रायव्हेट गोष्टींबद्दल बोलण्याचा आणि शिक्षक-विद्यार्थी नात्याची मर्यादा ओलांडणारे इशारे केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी इन्स्टाग्रामवरील शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील चॅटचा स्क्रीनशॉटही पोलिसांकडे सोपवला आहे.

हे ही वाचा: पत्नी आणि सासूला दगडाने ठेचून... नंतर घरामागे पुरलं अन् त्यावर केळीचं झाड; रचला भयानक कट

पोलिसांनी दिली माहिती 

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय महिला शिक्षिकेने रविवारी संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अल्पवयीन विद्यार्थ्याशी संवाद साधला. कोपरखैरणे पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने तक्रारीच्या आधारे सांगितले की, विद्यार्थ्याशी गप्पा मारताना शिक्षिका अयोग्यरित्या कपडे परिधान करत म्हणजेच अर्धनग्न अवस्थेत होती आणि मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करणारी दुष्कृत्ये करत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


 

    follow whatsapp