विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत गावस्करांचं मोठं वक्तव्य, मला फक्त २० मिनिटं….

मुंबई तक

• 09:31 AM • 19 Jul 2022

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली हा सध्या खराब फॉर्म्सशी झुंजतोय. त्यामुळे त्याचा फॉर्म हा भारतीयांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. इंग्लडसोबतच्या सिरीजमध्ये त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या सिरीजमध्ये देखील कोहलीने सर्वांची निराशा केली. त्याला 5 सामन्यात 20 पेक्षा अधिक धावा काढता आल्या नाही. त्यामुळे त्याचा फॉर्म हा भारतीयांसाठी चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला […]

Mumbaitak
follow google news

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली हा सध्या खराब फॉर्म्सशी झुंजतोय. त्यामुळे त्याचा फॉर्म हा भारतीयांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. इंग्लडसोबतच्या सिरीजमध्ये त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या सिरीजमध्ये देखील कोहलीने सर्वांची निराशा केली. त्याला 5 सामन्यात 20 पेक्षा अधिक धावा काढता आल्या नाही. त्यामुळे त्याचा फॉर्म हा भारतीयांसाठी चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. यावरच बोलताना भारताचे माजी सलामीचे फलन्दाज आणि लिट्ल मास्टर म्हणून संबंधले जाणारे सुनील गावस्कर यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

विराट कोहलीला नेमकं काय म्हणाले सुनील गावस्कर?

इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, ‘जर मला विराट कोहलीचे 20 मिनिटे मिळाली तर मी त्याला काय करता येईल याबाबत चांगल्याप्रकारे सांगू शकेल. मी दिलेल्या सल्ल्याचा त्याला नक्कीच फायदा होईल. सध्या ऑफ स्टम्पच्या लाईनची जी समस्या आहे ती तरी योग्य पद्धतीने कशी खेळायची याबाबत मी त्याला सांगू शकेन’, असं गावस्कर म्हणाले. मला देखील ऑफ स्टम्पच्या लाईनने येणाऱ्या बॉलने परेशान केलं होतं. काही गोष्टी आहेत ज्या मदत करू शकतात त्या मी त्याला सांगू शकतो. त्यासाठी मला कोहलीचे 20 मिनिटे हवेत, असा विश्वास गावस्करांनी व्यक्त केला.

विराटच्या बॅटमधून रन्स निघत नाहीत. अशात बॅटीला बॉल लागण्यासाठीचा त्याचा प्रयत्न असायला पाहिजे. मात्र, त्याने प्रत्येक बॉलवर रन्सचं काढायला पाहिजे, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे, असं देखील कोहलीच्या बचावात गावस्कर म्हणाले. विराटने देशासाठी खेळताना जवळपास 70 शतकं झळकावले आहेत. अशात जर काही काळ तो अडचणीत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात फेलियर येत असतो, असं गावस्करांचं म्हणणं आहे.

2019 पासून कोहली खराब फॉर्मपासून झुंजतोय

मागच्या तीन वर्षात कोहली काही फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्याकडून धावा निघत नाहीयेत. त्यामुळे त्याला टीममधून काढण्याची देखील मागणी होत आहे. मोठ्याप्रमाणात कोहलीवर टीका होऊ लागली आहे. इंग्लडसोबतच्या मागच्या वनडे सामन्यात त्याने अनुक्रमे 11, 20, 01, 11, 16, 17 अशी निराशाजनक कामगिरी केली आहे. आगामी होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात तो संघाचा भाग नसणार आहे. आता या मधल्या काळात विराट आपल्या मागच्या फॉर्ममध्ये परततो का? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे.

    follow whatsapp