टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. भाविना पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्यपदकाची कमाई केल्यानंतर उंच उडीत आणखी एका रौप्यपदकाची कमाई केली आहे. यामुळे भारताच्या खात्यात आता दोन पदकं झालेली आहेत.
ADVERTISEMENT
निषाद सुवर्णपदकाच्या शर्यतीत अमेरिकेच्या टाउन्सेंड रोड्रीक्सच्या पाठीमागे राहिला. ज्यामुळे निषादला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. निषादचा सहकारी रामपाल या या क्रीडा प्रकारात पाचव्या स्थानावर राहिल्यामुळे भारताचं एक पदक थोडक्यात हुकलं. निषादने पहिल्याच प्रयत्नात २.०६ मी. उडी मारत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
परंतू अमेरिकेच्या टाउन्सेंडने २.१५ मी. चं अंतर पार करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. अमेरिकेच्याच वाईस डलासला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. निषाद आधी टेबल टेनिसमध्ये भारताच्या भाविना पटेलला अंतिम फेरीत चीनच्या खेळाडूकडून पराभव स्विकारावा लागला होता. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्वच स्तरातून निषादचं कौतुक केलं जात आहे.
याव्यतिरीक्त तिरंदाजीत भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. राकेश कुमार आणि ज्योती बालियान या मिश्र दुहेरी जोडीला उपांत्य पूर्व फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला.
Paralympics: लढवय्या भाविना पटेलला पॅरालॉम्पिक टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक!
ADVERTISEMENT
