IPL 2021 : इशान किशन-सूर्यकुमारची फटकेबाजी, प्ले-ऑफसाठी मुंबईला करावी लागेल ही कामगिरी

मुंबई तक

• 04:28 PM • 08 Oct 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्ध सामन्यात २३५ धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हैदराबादविरुद्ध धावांचा मोठा डोंगर उभा केला. परंतू प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता हैदराबादला ६५ धावांच्या आत गुंडाळावं लागणार आहे. इशान किशनने ८४ तर सूर्यकुमार यादवने ८२ धावांची इनिंग खेळत मुंबईला […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्ध सामन्यात २३५ धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हैदराबादविरुद्ध धावांचा मोठा डोंगर उभा केला.

हे वाचलं का?

परंतू प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता हैदराबादला ६५ धावांच्या आत गुंडाळावं लागणार आहे.

इशान किशनने ८४ तर सूर्यकुमार यादवने ८२ धावांची इनिंग खेळत मुंबईला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला हैदराबादला १७१ धावांच्या फरकाने हरवायचं आहे. ही किमया साध्य झाली तरच मुंबई प्ले-ऑफमध्ये दाखल होईल.

आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली, परंतू मधल्या फळीत पोलार्ड, निशम, कृणाल पांड्या हे फटकेबाजी करुन धावा जमवण्यात अपयशी ठरले. हैदराबादकडून जेसन होल्डरने ४, राशिद खान-अभिषेक शर्माने प्रत्येकी २-२ तर उमरान मलिकने १ विकेट घेतली.

IPL 2021 : अबुधाबीत इशान किशनचं वादळ, महत्वाच्या सामन्यात विक्रमी इनिंग

    follow whatsapp