IPL 2021 : स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलियन प्लेअरची माघार, SRH च्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडूची एंट्री

मुंबई तक

• 01:06 PM • 31 Mar 2021

आयपीएलच्या चौदाव्या सिझनला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीची RCB यांच्यात सलामीचा सामना रंगेल. परंतू स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच सनराईजर्स हैदराबाद संघातून ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने माघार घेतली आहे. खासगी कारण देऊन मार्शने स्पर्धेतून माघार घेतली असून त्याच्या जागेवर सनराईजर्स हैदराबाद संघाने इंग्लंडचा […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या सिझनला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात होणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीची RCB यांच्यात सलामीचा सामना रंगेल. परंतू स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच सनराईजर्स हैदराबाद संघातून ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने माघार घेतली आहे. खासगी कारण देऊन मार्शने स्पर्धेतून माघार घेतली असून त्याच्या जागेवर सनराईजर्स हैदराबाद संघाने इंग्लंडचा धडाकेबाज ओपनर जेसन रॉयला संघात जागा दिली आहे.

हे वाचलं का?

आयपीएल २०२० मध्येही मिचेल मार्शला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. पहिल्याच सामन्यात मिचेल मार्शला संधी देण्यात आली होती…परंतू बॉलिंग दरम्यान त्याचा पाय दुखावला गेल्यामुळे तो नंतर एकही सामना खेळू शकला नाही. यानंतर त्याच्या जागेवर हैदराबादने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला संघात स्थान दिलं होतं. दरम्यान जेसन रॉयला संघात जागा देण्याची सनराईजर्स हैदराबादची रणनिती अनेकांना बुचकळ्यात टाकणारी आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यासारखी तगडी सलामीची जोडी असताना हैदराबादने जेसन रॉयला संघात स्थान दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

आयपीएलच्या चौदाव्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा युवा खेळाडू ऋषभ पंतच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋषभ नवीन सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन याची घोषणा केली आहे.

इंग्लंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात फिल्डींग करत असताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. मेडीकल टेस्ट केल्यानंतर त्याच्या खांद्याला झालेली दुखापत ही गंभीर असल्याचं समोर आलं होतं. ज्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या सिरीजनंतर आयपीएलमधूनही माघार घ्यावी लागली होती. यानंतर दिल्लीची कॅप्टन्सी कोणाकडे जाणार याबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. अखेरीस कॅप्टन्सीची ही माळ पंतच्या गळ्यात पडली आहे.

IPL 2021: Soft Signal नाही, ९० मिनीटांमध्ये संपवायची इनिंग…BCCI कडून नवीन नियम जाहीर

    follow whatsapp