IPL 2021 : गतविजेत्यांचं भवितव्य ‘जर-तर’ वर, प्ले-ऑफ प्रवेशासाठी काय आहे मुंबईसमोरचे निकष?

मुंबई तक

• 03:09 PM • 02 Oct 2021

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं आयपीएलच्या चौदाव्या हंगामातलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. अखेरच्या तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने मुंबईने जिंकले असते तर त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत झालं असतं. परंतू दिल्लीविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आता जर-तर आणि इतर संघांच्या विजय-पराभवावर अवलंबून रहावं लागणार आहे. जाणून घेऊयात प्ले-ऑफ पात्रतेसाठी मुंबई […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं आयपीएलच्या चौदाव्या हंगामातलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. अखेरच्या तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने मुंबईने जिंकले असते तर त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत झालं असतं. परंतू दिल्लीविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आता जर-तर आणि इतर संघांच्या विजय-पराभवावर अवलंबून रहावं लागणार आहे.

हे वाचलं का?

जाणून घेऊयात प्ले-ऑफ पात्रतेसाठी मुंबई इंडियन्ससमोरचे निकष –

१) उर्वरित तीन सामन्यांपैकी तिन्ही सामन्यांत जर मुंबई इंडियन्स जिंकली असली तर त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत झालं असतं. परंतू दिल्लीविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्यानंतर मुंबईची एक शक्यता मावळली आहे.

२) उर्वरित दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर नेट रनरेटच्या आधारावर प्ले-ऑफ पात्रतेचा निकाल लागू शकतो.

३) उर्वरित दोन सामन्यांपैकी मुंबईने एकच सामना जिंकला तर कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्याच्या निकालावर मुंबईचं भवितव्य ठरेल.

महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर असून त्यांचा रन रेट हा सध्या – ०.४५ इतका कमी आहे. ज्या चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स संघ सध्या झगडतोय तिकडे पात्र ठरण्यासाठी हा रनरेट खूपच कमी आहे. मुंबईचे उर्वरित दोन सामने राजस्थान आणि हैदराबाद संघाविरुद्ध असणार आहेत. त्यामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि इतर शक्यता जुळून आल्या तरच यंदा गतविजेत्या मुंबईला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळू शकतं.

IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये प्रवेशासाठी मुंबईची आशा धुसर, रंगतदार सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय

दरम्यान, मुंबईने दिल्लीला विजयासाठी १३० धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना, दिल्लीची सुरुवातही खराब झाली. शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव्ह स्मिथ, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हे बिनीचे शिलेदार एकामागोमाग एक आऊट होत राहिल्यामुळे एका क्षणाला दिल्लीचा संघ ५ बाद ७७ अशा खडतर परिस्थितीत सापडला होता. मधल्या फळीत दिल्लीचा माजी कॅप्टन श्रेयस अय्यर आणि हेटमायरने भागीदारी करुन दिल्लीला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतू बुमराहने हेटमायरची विकेट घेत दिल्लीच्या अडचणींमध्ये आणखी भर घातली.

परंतू यानंतर मैदानावर आलेल्या आश्विनने श्रेयसची उत्तम साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी फारशी जोखीम न घेता गरजेच्या वेळी फटकेबाजी आणि त्याव्यतिरीक्त एकेरी-दुहेरी धावांचा ओघ सुरु ठेवला. मुंबईच्या बॉलर्सनी ही जोडी फोडण्याचे प्रयत्न केले खरे…पण त्यांना यश आलं नाही.

    follow whatsapp