IPL 2022 : अहमदाबादच्या संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे जाण्याचे संकेत

मुंबई तक

• 11:16 AM • 11 Jan 2022

बीसीसीआयने आगामी आयपीएल हंगामासाठी अहमदाबाद संघाचे मालकी हक्क विकत घेतलेल्या CVC Capitals ला आपला हिरवा कंदील दाखवत Letter of Intent दिलं आहे. अहमदाबाद संघाने याआधीच आपल्या व्यवस्थापनावर काम करायला सुरुवात केली असून काही तांत्रिक बाबींवर बीसीसीआयसोबत अजुनही काम सुरु असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याकडे अहमदाबाद संघाचं नेतृत्व जाण्याची शक्यता आहे. […]

Mumbaitak
follow google news

बीसीसीआयने आगामी आयपीएल हंगामासाठी अहमदाबाद संघाचे मालकी हक्क विकत घेतलेल्या CVC Capitals ला आपला हिरवा कंदील दाखवत Letter of Intent दिलं आहे. अहमदाबाद संघाने याआधीच आपल्या व्यवस्थापनावर काम करायला सुरुवात केली असून काही तांत्रिक बाबींवर बीसीसीआयसोबत अजुनही काम सुरु असल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याकडे अहमदाबाद संघाचं नेतृत्व जाण्याची शक्यता आहे. भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराकडे अहमदाबाद संघाचं मुख्य प्रशिक्षकपद जाणार असल्याचीही चर्चा आहे. सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे जुळून आल्या तर हार्दिकसाठी ही अत्यंत चांगली संधी ठरु शकते. सध्या आपल्या फिटनेसवर काम करत असलेल्या हार्दिक पांड्याला संघात जागा मिळालेली नाहीये.

TATA उद्योगसमुह घेणार VIVO ची जागा, यंदाच्या हंगामापासून देणार स्पॉन्सरशीप

हार्दिक पांड्यासोबतच अहमदाबादचं संघ प्रशासन अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानशीही चर्चा करत असल्याचं कळतंय. राशिद खानची अहमदाबाद आणि लखनऊ या दोन्ही संघांशी चर्चा सुरु आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक इशान किशनसाठीही अहमदाबादचं संघ प्रशासन उत्सुक असल्याचं कळतंय. आयपीएलच्या मेगा ऑक्शनआधी दोन्ही नवीन संघांना आपल्या तीन खेळाडूंची नावं बीसीसीआयला द्यावी लागणार आहे. ११-१२ फेब्रुवारीला बंगळुरुत हे मेगा ऑक्शन भरवलं जाण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp