ADVERTISEMENT
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून हा सीझन 31 मार्चपासून सुरू होतोय.
एका मोठ्या कालावधीनंतर संपूर्ण देशात आयपीएल खेळवली जाणार आहे. आयपीएलचा हा 16वा सीझन आहे.
यंदाचा हा सीझन खास आहे कारण, महेंद्रसिंग धोनीचं हे शेवटचं आयपीएलचं वर्ष असण्याची शक्यता आहे.
याआधी महेंद्रसिंग धोनीनं सांगितलं होतं की, तो शेवटचा टी-२० सामना चेन्नईतच खेळू इच्छितो.
चेन्नई सुपर किंग्जला या सीझनमध्ये 14 सामने खेळायचे आहेत. आयपीएलमध्ये प्रत्येक संघासोबत 2-2 सामने आहेत.
यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा संघ पंजाब, गुजरात, हैदराबाद, बंगळुरू या गटात आहे.
महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2023 मधील शेवटचा सामना 14 मे रोजी चेन्नईच्या मैदानावर खेळणार आहे.
ADVERTISEMENT
