अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्यच करावे लागतील, आशिष शेलार यांनी खडसावले; आता राष्ट्रवादीचंही प्रत्युत्तर

Ajit Pawar NCP will have to accept Savarkar ideology Ashish Shelar warned : अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांची विचारधारा मान्यच करावी लागेल, असं आशिष शेलार यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय. दरम्यान, आशिष शेलारांच्या या इशाऱ्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय

Ajit Pawar NCP will have to accept Savarkar ideology Ashish Shelar warned

Ajit Pawar NCP will have to accept Savarkar ideology Ashish Shelar warned

मुंबई तक

06 Jan 2026 (अपडेटेड: 06 Jan 2026, 02:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्यच करावे लागतील

point

आशिष शेलार यांनी खडसावले

Ajit Pawar NCP will have to accept Savarkar ideology Ashish Shelar warned : "रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत की, आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहेत. त्यामुळे त्याठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. ते विचार आमचे असे आहेत की, याल तर तुमच्याबरोबर आणि न याल तर तुमच्याविना...शिवाय विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात काम करु", असं भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांची विचारधारा मान्यच करावी लागेल, असं आशिष शेलार यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय.

हे वाचलं का?

हेही वाचा : राज ठाकरेंना धक्का, नितेश राणेंनी खास माणूस फोडला, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, आशिष शेलारांच्या या इशाऱ्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. "प्रिय आशिष शेलार जी ,दादा व दादांचा पक्ष तुमच्या “आदर्शांच्या”नेतृत्वावरच चालला पाहिजे हा जो तुमचा अट्टाहास आहे व हे जे तुम्ही ठासून सांगत आहात त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहीत.तुर्तास इतकंच सांगेल आम्ही “शिव शाहु फुले आंबेडकरी” चळवळीशी बांधील व प्रामाणिक होतो,आहोत आणि राहु. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्वीकारावीच लागते हे त्रिवार सत्य आहे.#जय शिवराय जय भीम ", असं अमोल मिटकरी म्हणाले.

शेलारांना नाईलाजाने का होईना, शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार स्वीकारावाच लागतो - मिटकरी 

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, सावरकरांचा विज्ञानवाद आशिष शेलारांना मान्य आहे का? सावरकरांची त्यांची विचारधारा असेल, पण त्यांनी कोणावर लादण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. आम्ही देखील त्यांच्यावर आमचे विचार लादत नाहीत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारावर त्यांना स्वीकारावरच लागेल. तो विचार सोडला तर त्यांची ओळख पुसली जाईल, त्यामुळे नाईलाजाने का होईना, त्यांना हे विचार स्विकारावे लागतात. रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही समजावून सांगितलं होतं, अशी भाषा करु नका. राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देते हे पाहाण्यासाठी ते डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीत काय वितुष्ट यावं असं मला वाटत नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

राज ठाकरेंना धक्का, नितेश राणेंनी खास माणूस फोडला, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया

 

    follow whatsapp