Crime News: बिहारमधून अनैतिक संबंधाचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एका अल्पवयीन तरुणीचे तिच्या दाजीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते आणि याच संबंधातून ती गर्भवती राहिली. मात्र, पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर, काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिचा दाजी फरार झाला. संबंधित प्रकरण हे पश्चिम चंपारणच्या मझौलिया परिसरातील आहे.
ADVERTISEMENT
मझौलिया पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका गावातील रहिवासी असलेली तरुणी ही तिच्या दाजीपासून गर्भवती राहिली. 31 डिसेंबर रोजी अल्पवयीन तरुणीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. परंतु, चार दिवसांनंतरच सोमवारी नवजात बाळाचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: Govt Job: 'कोचीन शिपयार्ड'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! लवकरच करा अप्लाय... काय आहे पात्रता?
पीडितेच्या वडिलांनी दाखल केली तक्रार
या प्रकरणासंबंधी पीडितेच्या वडिलांनी चनटिया परिसरात राहणाऱ्या तिच्या दाजीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि बाळाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच, आता आरोपी तरुण म्हणजेच अल्पवयीन पीडितेचा दाजी घर सोडून फरार झाल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या आरोपी फरार असून त्याला लवकरच अटक केली जाणार आहे. एफआयआरनुसार, तक्रारदाराला दोन मुली असून त्यांच्या बायकोचं निधन झालं आहे.
हे ही वाचा: नागपुरात खळबळ! गर्लफ्रेंडवर कमेंट केली, संतापलेल्या प्रियकराने मित्राचाच काढला काटा...
फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप
चनपटिया पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका तरुणासोबत त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं होतं. लग्नानंतर, त्यांच्या जावयाचं सासरी सतत येणं-जाणं असायचं. याच काळात, त्याने आपल्या लहान मुलीला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप तक्रारदाराने केला. तसेच, आरोपीने बऱ्याचदा तिचं लैंगिक शोषण केल्याचं सांगितलं जात आहे. आई नसल्याकारणाने 14 वर्षीय पीडित तरुणी घरी एकटीच असायची आणि याचा फायदा घेत आरोपी दाजीने तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले.
ADVERTISEMENT











