Govt Job: 'कोचीन शिपयार्ड'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! लवकरच करा अप्लाय... काय आहे पात्रता?

मुंबई तक

'कोचीन शिपयार्ड लिमिटेड'कडून लॅबोरेटरी असिस्टंट, स्टोर कीपर आणि असिस्टंटसह बऱ्याच मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

ADVERTISEMENT

'कोचीन शिपयार्ड'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
'कोचीन शिपयार्ड'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'कोचीन शिपयार्ड'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

point

भरतीसाठी लवकरच करा अर्ज...

point

काय आहे पात्रता?

Cochin Shipyard Recruitment 2026: 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड'कडून लॅबोरेटरी असिस्टंट, स्टोर कीपर आणि असिस्टंटसह बऱ्याच मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 132 रिक्त पदे भरली जाणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार cochinshipyard.in या कोचीन शिपयार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाली असून उमेदवार 12 जानेवारी 2026 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त पदांमध्ये अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 81, ओबीसी प्रवर्गातील 26, एससी प्रवर्गातील 16 आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 9 पदांचा समावेश आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी 35 वर्षे उच्च वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून 12 जानेवारी 2026 तारीख लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. 

काय आहे पात्रता? 

सीनिअर शिप ड्राफ्ट्समॅन पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात किमान 60 गुणांसह तीन वर्षांचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. यासोबतच, 2 वर्षांचा कार्याचा अनुभव सुद्धा ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच, जुनिअर टेक्निकल असिस्टंट पदांसाठी संबंधित क्षेत्रात तीन वर्षांचा डिप्लोमा आणि 4 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. स्टोअरकीपरसाठी चार वर्षांचा अनुभव असलेले मटेरियल मॅनेजमेंटमध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर डिप्लोमा आवश्यक आहे. याशिवाय, असिस्टंट पदांसाटी बॅचलर पदवी आणि किमान चार वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. 

हे ही वाचा: बीडमध्ये थरार! मध्यरात्री दरवाजा तोडून घरात घुसले अन् महिलेसोबत घडलं भयंकर... नेमकं प्रकरण काय?

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम cochinshipyard.in या अधिकृत वेबसाइटवर जा. 
2. त्यानंतर, करिअर पेजवरील (CSL, Kochi) या टॅबवर क्लिक करा. 
3. आता, फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन टॅबवर जाऊन बेसिक माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन नंबर तसेच पासवर्ड तयार करा. 
4. नंतर, पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबरच्या साहाय्याने लॉगिन करा आणि अर्जात शैक्षणिक तसेच वैयक्तिक माहिती भरून पूर्ण करा. 
5. माहिती भरल्यानंतर, पासपोर्ट साइज फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करा. 
6. शेवटी, प्रवर्गानुसार अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp