Mary DiCosta Reveals : टीम इंडियाची महिला क्रिकेटपटू स्मृति मंदाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा 22 नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. पण, स्मृतीचे वडील श्रीनाथ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती स्मृतिच्या मॅनेजरने दिली होती. पण, यामागे नेमकं भलतंच काहीतरी घडत असल्याचा संशय आता होताना दिसतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईतील रेल्वे स्थानकावर तरुणाचे मुलीकडे पाहून अश्लील चाळे, तरुणीने कानाखाली काढला जाळ, VIDEO
पलाश मुच्छल आणि स्मृति मंदाना प्रकरणात ट्विस्ट
सध्या पलश मुच्छलची आई अमिता रडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पलशने तिला फसवल्याच्या चर्चा आता समाजमाध्यमांवर होऊ लागल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात एक ट्विस्ट निर्माण झाला असून पलाशने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, यामुळे पलाशच्या आणि स्मितीच्या नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जेव्हा विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर स्मृतीने आपल्या सोशल मीडियावरील सर्व लग्नाचे फोटो डिलिट करण्याचा निर्णय घेतला. याचमुळे आता मुच्छल आणि स्मृतिच्या नातेसंबंधावर अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच आता पलाशची एक्स गर्लफ्रेंड मेरी डि'कोस्टाचे चॅट्स सोशल मीडियावर धुरळा उडवत आहेत. मेरीसोबतचे ते चॅट्स हे मे महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील पलाश मुच्छलचे मेसेज हे फ्लर्टिंग सारखे वाटत आहेत, पण याबाबत अधिकृत कुठेच सांगितलं गेलं नाही.
कोण आहे मेरी डि'कोस्टा?
मेरी ही पलाश मुच्छलची एक्स गर्लफ्रेंड असल्याची चर्चा आहे. पण, स्मृती आणि पलाशच्या लग्नात ती एक कोरिओग्राफरच्या भूमिकेत होती. हा लग्नसोहळा रद्द पुढे ढकल्यानंतर अनेकजण तिला पलाश आणि स्मृती यांच्याशी जोडत आहेत. हे प्रकरण नीट समजून घेतल्यानंतर तिने इंस्टावरती एक स्टोरी शेअर करत लिहिलं की, 'मी पलाशला कधीही भेटलेली नाही'.
हे ही वाचा : आधी कौमार्य चाचणी, चारित्र्यावर संशय अन् पतीचे अनैतिक संबंध! लग्नानंतर 6 महिन्यांतच नाशिकमध्ये नवविवाहितेची आत्महत्या
अशातच आता मेरी डि'कोस्टा ही सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली आहे. अशातच आता काही फॅन्सने पलाश मुच्छलच्या एक्स गर्लफ्रेंडबाबत अनेक माहितीचा शोध घेतला होता. व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, डॉ. बिरवा शाह ही पलाश मुच्छलची गर्लफ्रेंड होती. दोघांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा पलाश बरवाला रोमँटिक अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
ADVERTISEMENT











