मुंबईतील रेल्वे स्थानकावर तरुणाचे मुलीकडे पाहून अश्लील चाळे, तरुणीने कानाखाली काढला जाळ, VIDEO

मुंबई तक

Mumbai news : मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकावर तरुणाने एका तरुणीकडे बघून अश्लील चाळे केले आहेत. यानंतर तरुणीने चांगलाच जाब विचारला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai news
Mumbai news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गोवंडी रेल्वे स्थानकावर तरुणाचे अश्लील चाळे

point

तरुणीने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला

Mumbai news : देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराकडे पाहिलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर महिलांच्या छेडछाडीच्या अनेक धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. त्यानंतर अशीच एक घटना गोवंडी रेल्वे स्थानकावर घडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात तरुणीने अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे.  

हे ही वाचा : शरद पवार गटाच्या नेत्यावर सत्तूरसह तलवारीने केले वार, गाडीवर दगडफेक करत केली तोडफोड, प्रकृती चिंताजनक

गोवंडी रेल्वे स्थानकावर तरुणाचे अश्लील चाळे

तरुणाने अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ तिने रेकॉर्ड केला नंतर त्या तरुणीला जाब विचारण्यास सुरुवात केली. तरुणाने केलेल्या या हावभावाच्या  घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. तरुणीने तरुणाला विचारलेल्या जाबाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. ही धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली असल्याची माहिती आहे. 

तरुणीने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suraj Ojha (@surajojhaa)

तरुणी रेल्वेची वाट बघत असताना तरुणाने तिच्याकडे पाहून अश्लील कृत्य केले होते. हे सर्व चित्र पाहून तिने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईलमध्ये तरुणाने केलेल्या हावभावाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तेव्हा ती थेट त्या तरुणाजवळ गेली आणि नंतर त्याने केलेल्या कृत्याबाबत जाब विचारला. 

तरुणीने तरुणाला विचारला जाब विचारत कानशील रंगवलं

व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसते की गोवंडी रेल्वे स्थानकावर एक तरुण तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. त्याचक्षणी तिने प्लॅटफॉर्म बदलत त्याच्याकडे जाऊन त्याला थेट जाब विचारत खडसावलं. माझ्याकडे बघून कसे हावभाव करत होता? थांब तुला व्हिडिओ दाखवते, असं म्हणत तिने त्याचं कानशिल रंगवलं

हे वाचलं का?

    follow whatsapp