शरद पवार गटाच्या नेत्यावर सत्तूरसह तलवारीने केले वार, गाडीवर दगडफेक करत केली तोडफोड, प्रकृती चिंताजनक
Sharad Pawar Camp leader Attack :शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दहा ते पंधरा जणांनी मिळून अहिल्यानगर-बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच मांदगावानजीकच हा हल्ला करण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला
हल्ल्यामागील कारण काय?
Sharad Pawar Camp leader Attack : शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दहा ते पंधरा जणांनी मिळून अहिल्यानगर-बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच मांदगावानजीकच हा हल्ला करण्यात आला होता. राम खाडे यांची एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. तसेच ते शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम देखील करतात. या प्राणघातक हल्ल्यात राम खाडे हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी बुधवारी रात्री घडली.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार 'या' राशीतील लोकांना करिअरमध्ये होणार मोठा फायदा, पैशांची कधीच कमी भासणार नाही
नेमकं रात्री काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर-बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच मांदगाव येथून राम खाडे आपल्या सहकाऱ्यांसोबत अहिल्यानगरकडे जात असताना ही घटना घडली. तेव्हा हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर हल्ला केला असता, गाडीची तोडफोड देखील केली होती. हल्लेखोरांनी लाठी-काठी, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरचा वापर करत त्यांच्यावर हल्ला चढवला होता. तेव्हा राम खाडे यांनी हल्लेखोरांचे अनेक वार आपल्या हातावर देखील झेलले होते. राम खाडेंच्या तुलनेत 15 जणांच्या टोळक्यांनी त्यांना बेदम मारहाण केली, या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले.
हल्ल्यामागील कारण काय?
राम खाडे यांच्या गंभीर परिस्थिती पाहून त्यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान, राम खाडेवर कोणी वार केले आणि त्यामागील नेमकं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर समोर आलेलं नाही.
हे ही वाचा : नाशिक : नवऱ्याने प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो दाखवले, मासिक पाळी येत नसल्याने टोमणे; लग्नाच्या 6 महिन्यानंतर नवविवाहितेची आत्महत्या
तसेच राम खाडेंची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर परिस्थिती बघता त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.










