IND vs AUS 1st Test : जाडेजाला क्रीमची कृती महागात; मॅच संपताच ICC चा दणका

मुंबई तक

• 11:57 AM • 11 Feb 2023

Ind vs Aus 1st Test Day 3rd नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय साकारला. भारताने एक डाव आणि १३२ धावांनी कांगारुंचा पराभव करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव […]

Mumbai Tak
Google CTA

Ind vs Aus 1st Test Day 3rd

हे वाचलं का?

नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय साकारला. भारताने एक डाव आणि १३२ धावांनी कांगारुंचा पराभव करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावातच संपुष्टात आला. (India vs Australia 1st Test Day 3 | Cricket Score Update)

भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने ३७ धावात ५ विकेट्स घेतल्या. तर जाडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याच्या दोन्ही डावात मिळून अश्विनने ८ विकेट्स घेतल्या. तर जाडेजाने ७ विकेट्स आणि १ अर्धशतक झळकावतं अष्टपैलू कामगिरी केली.

भारताच्या या मोठ्या विजयाच्या आनंदोत्सव साजरा होत असतानाच संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला आयसीसीने शिक्षा ठोठावली आहे. सामन्यात पहिल्या दिवशी अंपायरच्या परवानगीशिवाय बोटावर क्रीम लावलं त्याला महागात पडलं आहे. जाडेजाला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला आहे. रवींद्र जडेजाला आयसीसीच्या लेव्हल-1 नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.

IND vs AUS 1st Test : कांगारुंचं लोटांगण; भारताचा एक डाव अन् 132 धावांनी विजय

आयसीसीने एका पत्रकात म्हटलं की, ‘रवींद्र जडेजाने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या ICC आचारसंहितेच्या कलम 2.20 चे उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. जाडेजाचे हे वर्तन खेळ भावनेच्या विरोधात होते. जडेजानेही हा गुन्हा कबूल केला असून औपचारिक सुनावणीची गरज नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. दरम्यान, बॉल टेम्परिंग प्रकरणात जाडेजा दोषी आढळलेला नाही.

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी (९ फेब्रुवारी) रोजी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६ व्या षटकातील आहे. या ओव्हरदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओत जडेजा सिराजच्या तळहातातून क्रीमसारखे काहीतरी घेऊन डाव्या हाताच्या तर्जनीवर लावताना दिसत आहे. जडेजाने मैदानावरील पंचांच्या परवानगीशिवाय हे केले, त्यामुळे त्याला शिक्षा झाली आहे.