Ajinkya Rahane Networth : मुंबईत आलिशान घर, लक्झरी कार्स... मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची संपत्ती आहे तरी किती?

मुंबई तक

• 02:23 PM • 30 Jul 2026

भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटच्या मैदानासोबतच त्याने कमाईच्या बाबतीतही दमदार कामगिरी केली आहे. त्याच्याकडे नेमकी संपत्ती आहे तरी किती? जाणून घेऊया.

Ajinkya Rahane Networth

Ajinkya Rahane Networth

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईत आलिशान घर, लक्झरी कार्स

point

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची संपत्ती आहे तरी किती?

Ajinkya Rahane Networth : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुरुवारी (30 जुलै) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. "अनेक वर्षांपासून दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, मी सदैव आभारी राहीन," असे लिहीत 38 वर्षीय रहाणेने क्रिकेटच्या मैदानातील आपल्या प्रदीर्घ प्रवासाला पूर्णविराम दिला. कसोटी, वनडे आणि आयपीएल अशा तिन्ही प्रकारांत आपल्या उत्कृष्ट फलंदाजीचा ठसा उमटवणाऱ्या रहाणेने गेल्या आयपीएल हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचे नेतृत्वही केले होते.

हे वाचलं का?

कोट्यवधींची संपत्ती

खेळातील उत्कृष्ट कामगिरीसोबतच अजिंक्य रहाणे कमाईच्या बाबतीतही मागे राहिलेला नाही. विविध माध्यमांतील अहवालानुसार, क्रिकेटला अलविदा म्हणणाऱ्या रहाणेची एकूण संपत्ती सुमारे 80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्याच्या या एकूण संपत्तीमध्ये क्रिकेटमधून मिळालेले मानधन आणि आयपीएल करारांचा मोठा वाटा आहे. तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) 'बी-ग्रेड' करारात समाविष्ट होता, ज्याद्वारे त्याला वर्षाला 3 कोटी रुपये मानधन मिळत असे. याशिवाय आयपीएलच्या विविध हंगामांतही त्याच्यावर मोठी बोली लावली गेली होती, ज्यामध्ये 2016 ते 2018 दरम्यान त्याला सर्वाधिक 8 ते 9.5 कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते, तर गेल्या हंगामात त्याला 1.5 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते.

हे ही वाचा : ‘तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही…’, ‘ती’ घोषणा करत अजिंक्य रहाणेला रडूच कोसळलं!

एका जाहिरातीसाठी एक कोटी

केवळ मैदानावरच नव्हे, तर ब्रँड एंडोर्समेंटच्या जगातही अजिंक्य रहाणेचा मोठा दबदबा राहिला आहे. Nike, CEAT, Boost, ELSA Corp आणि IDFC FIRST Bank यांसारख्या अनेक नामांकित आणि मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये तो झळकला आहे. प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटमधून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करत असून, एका अहवालानुसार एका जाहिरातीसाठी तो सुमारे 1 कोटी रुपयांचे मानधन घेतो. या ब्रँड अँम्बेसेडरशिपमुळे त्याच्या एकूण संपत्तीत आणि उत्पन्नात मोठी भर पडली आहे.

हे ही वाचा : तुफान व्हायरल इरफान जेव्हा राजदीप सरदेसाईंना भेटला... जबरदस्त मुलाखत

लक्झरी गाड्या अन् आलिशान घर

अजिंक्य रहाणेचे राहणीमान अत्यंत आलिशान असून त्याला महागड्या आणि लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक GLS 600 SUV, बीएमडब्ल्यू 6 सिरीज GT, ऑडी Q5 आणि टोयोटा यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांशिवाय, मुंबईत त्याचे स्वतःचे एक अत्यंत सुंदर आणि आलिशान घर आहे, ज्याचे अंदाजे मूल्य सुमारे 20 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे, मैदानातील उत्कृष्ट कारकिर्दीसोबतच रहाणेने स्वतःची एक भक्कम आर्थिक पार्श्वभूमीही तयार केली आहे.