Rishabh Pant : धोनीला जमलं नाही ते पंतने करून दाखवलं, IPL ऑक्शनमध्ये रचला इतिहास

प्रशांत गोमाणे

19 Dec 2023 (अपडेटेड: 19 Dec 2023, 12:56 PM)

विकेटकीपर फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात सहभागी होण्यासाठी दुबईला पोहोचला आहे. आयपीएलच्या इतिहासात एखादा कर्णधार लिलावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

rishabh pant record ipl auction 2024 pant sitting in ipl auction first captain delhi capital 

rishabh pant record ipl auction 2024 pant sitting in ipl auction first captain delhi capital 

follow google news

Ipl Auction 2024, Rishabh Pant Record : आयपीएल 2024 साठी दुबईत खेळाडूंचा लिलाव सूरू आहे. या लिलावात अनेक खेळाडूंवर लाखो-करोडोची बोली लागते आहे. त्यामुळे सर्वांधिक रक्कम मिळवून खेळाडू खरेदीचा विक्रम करत आहेत. त्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant Record) अनोखा विक्रम केला आहे. हा विक्रम आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला जमला नाही आहे. त्यामुळे ऋषभ पंतने नेमका काय विक्रम केला आहे. ते जाणून घेऊयात. (rishabh pant record ipl auction 2024 pant sitting in ipl auction first captain delhi capital)

हे वाचलं का?

विकेटकीपर फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant)  इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात सहभागी होण्यासाठी दुबईला पोहोचला आहे. आयपीएलच्या इतिहासात एखादा कर्णधार लिलावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ऋषभ पंतने कर्णधार म्हणून हा अनोखा विक्रम केला आहे. हा विक्रम आतापर्यंत इतर कोणत्याच कर्णधाराला जमला नाही आहे.

हे ही वाचा :Dawood भारतातून फरार झाला ‘त्या’ रात्रीची कहाणी, मंत्रालयात ‘त्या’ नेत्याला फोन अन्…

गेल्या वर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला रुरकीजवळ पंतला अपघात झाला होता. या अपघातामुळे तो क्रिकेटपासून दूर झाला होता. तेव्हापासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) उपचार घेत होता. सध्या तो ठणठणीत बरा झाला आहे आणि मैदानात प्रॅक्टिस देखील करत आहे.

‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, पंत पुढील वर्षी आयपीएल 2024 मध्ये सहभागी होणार असून संघाचे नेतृत्वही करणार आहे. पंत फेब्रुवारीच्या अखेरीस पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गेल्या वर्षी पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी स्वीकारली. पंतच्या अनुपस्थितीमुळे आयपीएलमध्ये दिल्लीची कामगिरी अत्यंत खराब झाली होती.

हे ही वाचा :छगन भुजबळ कुटुंबासह ‘त्या’ मोठ्या प्रकरणातून सुटले, कोर्टाने काय दिला निकाल?

25 वर्षीय पंत आयपीएल थेट लिलावात सक्रियपणे सहभागी होणारा पहिला कर्णधार ठरला आहे. लिलावादरम्यान ऋषभ पंत आयपीएलच्या लिलावाच्या टेबलवर सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंगसोबत दिसला. तिथेही त्याने थेट लिलावात सहभाग नोंदवला होता.

आयपीएल करिअर

ऋषभ पंतच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो 98 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 2838 धावा केल्या आहेत. तर पंतने 33 कसोटीत 2271 धावा केल्या आहेत. त्याने 30 वनडे सामन्यांमध्ये आपल्या बॅटने 865 धावा केल्या आहेत. 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 987 धावा केल्या.

    follow whatsapp