हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये 'या' पैलवानाची बाजी, पृथ्वीराज मोहोळने का घेतली माघार?

साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा आज अत्यंत थरारक वातावरणात समारोप झाला. यंदाच्या हिंदकेसरी गदेवर सोलापूरचे पैलवान महेंद्र गायकवाड यांनी नाव कोरलं.

Hindkeasri Final 2026

Hindkeasri Final 2026

इम्तियाज मुजावर

18 May 2026 (अपडेटेड: 18 May 2026, 11:29 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये 'या' पैलवानाची बाजी

point

पृथ्वीराज मोहोळने का घेतली माघार?

Hindkeasri Final 2026 : साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा आज अत्यंत थरारक वातावरणात समारोप झाला. यंदाच्या हिंदकेसरी गदेवर सोलापूरचे पैलवान महेंद्र गायकवाड यांनी नाव कोरलं. तीन वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या महेंद्रने आता हिंदकेसरीचाही मान पटकावत आपल्या कारकिर्दीत सुवर्णक्षण नोंदवला आहे.

हे वाचलं का?

पृथ्वीराज मोहोळ जखमी अन्..

अंतिम लढतीमध्ये पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात जोरदार सामना रंगला होता. मात्र सामन्यादरम्यान पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्यामुळे त्याला अखेर माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर पंचांनी महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करत मानाची हिंदकेसरी गदा प्रदान केली. यावेळी महेंद्रने गदा उंचावताच छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जल्लोष उसळला. हजारो कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात नव्या हिंदकेसरीचं स्वागत केलं. यावेळी मैदानात “महेंद्र... महेंद्र...” अशा घोषणा देत चाहत्यांनी वातावरण दणाणून सोडलं.

हे ही वाचा : डोंबिवली : 2 अल्पवयीन मुलींना दिवस गेले, कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली, काय घडलं?

महिला हिंदकेसरी कोण?

दरम्यान महिला हिंदकेसरी स्पर्धेत हरियाणाच्या काजल डोचक हिने शानदार कामगिरी करत किताबावर कब्जा केला. अंतिम सामन्यानंतर काजलने गदा उंचावत आनंद व्यक्त केला... महिला कुस्तीतील ताकद, आत्मविश्वास आणि जिद्दीचं दर्शन या स्पर्धेत पाहायला मिळालं.

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी खुशखबर, 165 कोटींचं उभारलं कॅन्सर रुग्णालय

साताऱ्याचा आखाडा दणाणून गेला

कुस्तीमहर्षी पैलवान साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ, राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीमुळे साताऱ्याचा आखाडा अक्षरशः दणाणून गेला होता. अखेर महेंद्र गायकवाड व काजल डोचक यांनी हिंदकेसरी गदा पटकावत आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.