सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस आहे खास, जाणून घ्या कारण

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन अनेक वर्ष उलटली आहेत, पण आजही सचिनच्या प्रसिद्धीमध्ये तसूभरही फरक पडला नाही. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला नुकतचं आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. मुंबई इंडियन्सने २० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. यावरुन सचिन आणि अर्जुन तेंडुलकर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:13 AM • 24 Feb 2021

follow google news

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन अनेक वर्ष उलटली आहेत, पण आजही सचिनच्या प्रसिद्धीमध्ये तसूभरही फरक पडला नाही. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला नुकतचं आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. मुंबई इंडियन्सने २० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. यावरुन सचिन आणि अर्जुन तेंडुलकर चांगलेच चर्चेत होते. परंतू सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीत आजच्या दिवसाला अत्यंत महत्व आहे.

हे वाचलं का?

आपला बालपणीचा मित्र विनोद कांबळीसोबत सचिनने शालेय क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी ६६४ रन्सची विक्रमी पार्टनरशीप केली होती. विनोद कांबळीने या पार्टनरशीपदरम्यानचा एक खास फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत सचिनला आजच्या दिवसाची खास आठवण करुन दिली आहे.

यानंतर आजच्या दिवशी दहा वर्षांपूर्वी सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यात पहिल्यांदा डबल सेंच्युरी झळकावली होती. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा सचिन पहिला क्रिकेटपटू ठरला होता.

निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. एखाद्या मॅचवेळी आपली मतं, नवोदीत खेळाडूंना प्रोत्साहन देणं, सल्ले देणं अशा माध्यमातून सचिन आजही क्रिकेटशी आपली नाळ जोडून आहे.

    follow whatsapp