India vs South Africa: भारत विरुद्ध आफ्रिका सामन्यावर अजब संकट, जनरेटरची लागणार गरज

मुंबई तक

• 08:21 AM • 22 Sep 2022

ऑस्ट्रेलियाच्या मालिकेनंतर या महिन्यात भारतीय क्रिकेट संघाला भारतातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. आफ्रिकेविरुद्ध पहिली टी-20 मालिका खेळवली जाईल, त्याचा पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाईल. त्यापूर्वी तिरुवनंतपुरमच्या सामन्यात मोठे संकट उभे ठाकले आहे. वास्तविक, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. […]

Mumbaitak
follow google news

ऑस्ट्रेलियाच्या मालिकेनंतर या महिन्यात भारतीय क्रिकेट संघाला भारतातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. आफ्रिकेविरुद्ध पहिली टी-20 मालिका खेळवली जाईल, त्याचा पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाईल. त्यापूर्वी तिरुवनंतपुरमच्या सामन्यात मोठे संकट उभे ठाकले आहे. वास्तविक, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

‘जनरेटरचा सामना करावा लागला तरी सामना कोणत्याही परिस्थितीत होईल’

वीजपुरवठा खंडित झाल्याने सामना दुसरीकडे हलवला जाईल का?, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे. पण याबाबत केरळ क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबझला सांगितले की, हा सामना कोणत्याही परिस्थितीत आयोजित केला जाईल. मॅच पूर्ण करण्यासाठी आम्हाला जनरेटरचाच सहारा घ्यावा लागला तरीही घेऊ पण सामना पूर्ण करु. या सामन्यासाठी जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

केसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘वीज असो वा नसो, कोणत्याही परिस्थितीत जनरेटरच्या मदतीने सामना आयोजित केला जाईल. हा आंतरराष्ट्रीय सामना आहे, कारण कोणताही सामना राज्याच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून नसतो. सामन्याच्या आधी आणि इतर तयारीसाठी विजेची गरज असते. त्यासाठी बॅकअप तयार करण्यात आला आहे. जनरेटर लावला जाईल, आम्हाला सामना घ्यायचा आहे आणि तो होईल.

वीज बिल भरले आहे: KSFL

केरळच्या वीज मंडळाने स्टेडियमचे वीज कनेक्शन तोडले आहे, कारण त्यावर अडीच कोटी रुपयांहून अधिकचे बिल आले आहे. त्याच वेळी, ग्रीनफील्ड स्टेडियम केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेड (KSFL) च्या मालकीचे आहे. त्यांनी वीज बिल भरल्याचे सांगितले आहे.

केएसएफएलचे अधिकारी कृष्ण प्रसाद म्हणाले, ‘येथे एक थिएटर आणि एक सभागृह आहे. त्याचे वीज बिल थकीत आहे. त्याचा आम्हाला काही फायदा नाही. मग इतरांची बिले का भरायची?’ आत्तापर्यंत ग्रीनफिल्ड स्टेडियमवर 3 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यापैकी भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहेत, तर एक सामना गमावला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तीन T-20 मालिका)

पहिली T-20 (20 सप्टेंबर) – मोहाली

दुसरी T-20 (23 सप्टेंबर) – नागपूर

तिसरी T-20 (25 सप्टेंबर) – हैदराबाद

दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तीन T-20 मालिका)

पहिला T-20 सामना (28 सप्टेंबर) – तिरुवनंतपुरम

दुसरा T-20 सामना (2 ऑक्टोबर) – गुवाहाटी

तिसरा T20I सामना (4 ऑक्टोबर) – इंदूर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका)

पहिली एकदिवसीय (6 ऑक्टोबर) – लखनौ

दुसरी एकदिवसीय (9 ऑक्टोबर) – रांची

तिसरी एकदिवसीय (11 ऑक्टोबर) – दिल्ली

    follow whatsapp