मेहनतीचं फळ ! SRH चा युवा बॉलर उमरान मलिकला टी-२० वर्ल्डकपसाठी नेट बॉलर म्हणून संधी

मुंबई तक

• 09:20 AM • 10 Oct 2021

आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत टीम इंडियाला अनेक गुणवान खेळाडू मिळाले आहेत. जसप्रीत बुमराह, पांड्या बंधू, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर-राहुल चहर हे नवोदीत खेळाडू आयपीएलच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत टीम इंडियात सहभागी झाले. आयपीएलचा चौदावा हंगाम आणखी एका युवा खेळाडूला फायदेशीर ठरला आहे. जम्मू-काश्मीरचा युवा जलदगती गोलंदाज उमरान मलिकला आयपीएल संपल्यानंतरही युएईतच थांबण्याचे आदेश देण्यात आले […]

Mumbaitak
follow google news

आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत टीम इंडियाला अनेक गुणवान खेळाडू मिळाले आहेत. जसप्रीत बुमराह, पांड्या बंधू, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर-राहुल चहर हे नवोदीत खेळाडू आयपीएलच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत टीम इंडियात सहभागी झाले. आयपीएलचा चौदावा हंगाम आणखी एका युवा खेळाडूला फायदेशीर ठरला आहे.

हे वाचलं का?

जम्मू-काश्मीरचा युवा जलदगती गोलंदाज उमरान मलिकला आयपीएल संपल्यानंतरही युएईतच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टी-२० वर्ल्डकपसाठी उमरान मलिक भारतीय संघात नेट बॉलर म्हणून काम पाहणार आहे.

T-20 World Cup : भारताला हरवण्यासाठी पाक संघाला खास ऑफर, सामना जिंका ब्लँक चेक देतो…!

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं. यंदाच्या हंगामात हा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर राहिला. अखेरच्या काही सामन्यांमध्ये हैदराबादने मुळचा जम्मू-काश्मीरचा असलेल्या उमरान मलिकला संधी दिली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात उमरानने १५१.०३ kmph च्या वेगाने बॉल टाकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर RCB विरुद्धच्या सामन्यात उमरानने १५३ kmph च्या वेगाने बॉल टाकत आयपीएलमध्ये सर्वात जलद गतीने बॉल टाकणारा गोलंदाज असा बहुमानही मिळवला.

आयपीएलच्या उत्तरार्धात उमरानने केलेल्या कामगिरीचं सर्वांनी कौतुक केलं असून याच कारणासाठी त्याला टी-२० विश्वचषकासाठी युएईतच थांबायला सांगितलं आहे. उमरान मलिक हा हैदराबादच्या संघात नेट बॉलर म्हणून दाखल झाला होता. परंतू टी. नटराजनच्या दुखापतीनंतर त्याचा संघात समावेश झाला. यानंतर त्याने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनेही उमरान मलिकच्या वेगाचं कौतुक केलं आहे. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सुरुवातीच्या दिवसांमध्ये उमरान मलिकला त्याचा खेळ सुधारण्यासाठी मदत केली होती.

भारताने ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट क्षणार्धात कोसळेल – PCB प्रमुख रमीझ राजांनी व्यक्त केली भीती

    follow whatsapp