बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपची सुरुवात अतिशय आश्वासक पद्धतीने केली आहे. पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताचा १० विकेटने धुव्वा उडवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ५ विकेट राखून पराभव केला आहे.
ADVERTISEMENT
विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं लक्ष्य पाकिस्तानने मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिकच्या संयमी इनिंगच्या जोरावर पूर्ण केलं.
टी-२० विश्वचषक सुरु होण्याआधी न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान दौरा सुरु व्हायच्या आधीच सोडला होता. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी यंदा न्यूझीलंडला धडा शिकवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. बाबर आझमच्या पाकिस्तानी संघानेही आपली विजयी घौडदौड कायम करत न्यूझीलंडचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या विजयामुळे भारतीय संघाची आगामी वाटचाल आता खडतर होणार आहे.
Ind Vs Pak : वकार युनूसने मोहम्मद रिझवानच्या नमाज पठणावर केलेल्या विधानावर का निर्माण झालं वादंग?
सलग दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकत बाबर आझमने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि डॅरेल मिचेल यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. परंतू हारीस रौफच्या बॉलिंगवर गप्टील क्लिन बोल्ड झाला. यानंतर न्यूझीलंडच्या धावगतीला पूर्णपणे खिळ बसला. शारजाहच्या मैदानावर न्यूझीलंडचा एकही फलंदाज मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरला. केन विल्यमसन, कॉनवे यांनीही संथ खेळ केल्यामुळे न्यूझीलंडला निर्धारित ओव्हरमध्ये १३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून हारिस रौफने ४ तर शाहीन आफ्रिदी-इमाद वासिम आणि मोहम्मद हाफीज यांनी १-१ विकेट घेतली.
BLOG : याला कारण एकच…आम्हाला पराभव सहन होत नाही !
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी संघानेही सावध सुरुवात केली. टीम साऊदीने बाबर आझमला क्लिन बोल्ड करत न्यूझीलंडला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर फखार झमान, मोहम्मद हाफीज यांनाही न्यूझीलंडच्या बॉलर्सनी स्वस्तात गुंडाळून पाकिस्तानवर दडपण वाढवलं. एका क्षणाला पाकिस्तानचा संघ ५ बाद ८७ अशा बिकट अवस्थेत सापडलेला असताना शोएब मलिक आणि आसिफ अली यांनी महत्वाची भागीदारी करत पाकिस्तानचं आव्हान कायम राखलं. पाकिस्तानची ही जोडी फोडण्यात न्यूझीलंडचे बॉलर्स सपशेल अपयशी ठरले. अखेरीस विजयासाठीची औपचारिकता पूर्ण करत पाकिस्तानने या स्पर्धेतला दुसरा विजय संपादन केला.
ADVERTISEMENT










