IPL 2021 च्या प्रक्षेपणावर Taliban ने घातली बंदी, जाणून घ्या कारण

मुंबई तक

• 12:41 PM • 21 Sep 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात झाली. पहिल्या दोन सामन्यांनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून सामन्यांना प्रतिसाद मिळत आहे. परंतू अफगाणिस्तानात नव्याने आलेल्या तालिबान सरकारने आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. आयपीएलमध्ये इस्लामविरोधी गोष्टी असल्याचं कारण देत सध्याच्या तालिबान सरकारने या सामन्यांचं प्रक्षेपण बंद केलं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मीडिया मॅनेजर आणि पत्रकार इब्राहीम […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात झाली. पहिल्या दोन सामन्यांनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून सामन्यांना प्रतिसाद मिळत आहे. परंतू अफगाणिस्तानात नव्याने आलेल्या तालिबान सरकारने आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे.

हे वाचलं का?

आयपीएलमध्ये इस्लामविरोधी गोष्टी असल्याचं कारण देत सध्याच्या तालिबान सरकारने या सामन्यांचं प्रक्षेपण बंद केलं आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मीडिया मॅनेजर आणि पत्रकार इब्राहीम मोहंमद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दलची माहिती दिली आहे. चिअरलिडर्स, डोकं न झाकता मैदानात महिलांची उपस्थिती ही कारणं देत तालिबान सरकारने आयपीएल सामन्यांचं प्रक्षेपण रद्द केलं आहे.

अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर तालिबान सरकारने महिला क्रिकेट संघाला खेळण्यासाठी बंदी घातली आहे. परंतू पुरुष क्रिकेट संघाला त्यांनी खेळण्याची परवानगी दिली आहे. तालिबान सरकारच्या याच भूमिकेमुळे अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा गमावू शकतो.

    follow whatsapp