बीड जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

Beed Politics : केजच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या अगोदर त्या भाजप मध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला होता

beed politics

beed politics

मुंबई तक

18 Jan 2026 (अपडेटेड: 18 Jan 2026, 07:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ

point

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

Beed Politics , रोहिदास हातागळे/बीड : केजच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या अगोदर त्या भाजप मध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला होता आणि आता पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शिंदे गट, कलानी अन् इदनानी एकत्र लढले; तरी ठरले अपयशी, उल्हासनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

केज मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलले

बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असून केज मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलले आहे. यावेळी उपस्थित असलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संगीताताईंचे स्वागत करताना सांगितले की, 'बीड जिल्ह्यातील पहिले माजी आमदार शिवसेना पक्षासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्या येण्याने मराठवाड्यात, विशेषतः बीड जिल्ह्यात पक्ष अधिक सक्षम होईल.'

अनेक महत्त्वाच्या नेत्यांचाही शिवसेनेत प्रवेश

संगीताताई ठोंबरे यांच्यासोबत केज मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये किशोर थोरात (माजी सरपंच),विजय बापू केंद्रे (संस्थापक अध्यक्ष, भगवान सेना), अशोक सक्राते, अरविंद चाळक, उमेश चाळक यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिवचे शिवसेना नेते अजित दादा पिंगळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा : 15 दिवसांपूर्वी पत्नीचं निधन, ठाकरेंचा शिलेदार खचला नाही, 30 वर्षांच्या संघर्षानंतर शिवसेनेने मुंबईतील 'हा' वार्ड जिंकला

प्रवेशाबद्दल काय म्हणाल्या संगीताताई ठोंबरे?

'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची भक्कम उभारणी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत' असा विश्वास संगीताताई ठोंबरे यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगीताताईंना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन मतदारसंघात जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

    follow whatsapp