अंगावर थरकाप उडवणारा भीषण अपघात; पुण्यात मद्यधुंद चालकाचा धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

Pune Accident News : फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, नमूद वेळेस व ठिकाणी आरोपी विशाल अशोक कविकर याने मद्यसेवन करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात, बेदरकारपणे चालवले. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या फिर्यादीच्या तसेच बाजूच्या दुकानाला जोरदार धडक दिली.

Pune Accident News

Pune Accident News

मुंबई तक

18 Jan 2026 (अपडेटेड: 18 Jan 2026, 04:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंगावर थरकाप उडवणारा भीषण अपघात

point

पुण्यात मद्यधुंद चालकाचा धुमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

Pune Accident News, पुणे : पुणे शहरात एकामागून एक भीषण अपघातांच्या घटना समोर येत असतानाच आणखी एक अंगावर थरकाप उडवणारा अपघात घडल्याचे CCTV फुटेज समोर आले आहे. मद्यप्राशन करून भरधाव वेगात वाहन चालवणाऱ्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात रस्त्यालगत असलेल्या दोन ते तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हे वाचलं का?

समोर आलेल्या CCTV फुटेजमध्ये संबंधित चालक मद्यधुंद अवस्थेत अतिवेगाने वाहन चालवत असल्याचे स्पष्ट दिसून येते. नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दुकानांवर आदळले. धडकेमुळे दुकानांचे शटर, बाहेर ठेवलेली साहित्ये तसेच इतर संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या प्रकरणातील चालकाचे नाव विशाल अशोक कविकर (वय 31 वर्षे, रा. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एमएच 20 जीके 8969 क्रमांकाचे मोटार वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : नोकरीवरून घरी परतत होता तरुण, नियंत्रण सुटून कार पडली पाण्यात, अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, नमूद वेळेस व ठिकाणी आरोपी विशाल अशोक कविकर याने मद्यसेवन करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात, बेदरकारपणे चालवले. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या फिर्यादीच्या तसेच बाजूच्या दुकानाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुकानाचे शटर, बाहेर ठेवलेले आईस्क्रीम डीप फ्रीज तसेच मयूर जनरल स्टोअरच्या बाहेरील भागाचे मोठे नुकसान झाले. तसेच आरोपीच्या वाहनाचेही नुकसान झाले.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर अपघाताचा CCTV व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर 5 जणांचा दुर्दैवी अंत

    follow whatsapp