उमेश यादव बनला ‘बापमाणूस’, सोशल मीडियावर दिली माहिती

टीम इंडियाचा गोलंदाज उमेश यादव बाप बनला आहे. त्याची बायको तानियाने नुकताच एका चिमुकलीला जन्म दिला आहे. उमेश यादव सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्ट सामने खेळत आहे. या सामन्या दरम्यान त्याला खुशखबर आली आहे. उमेश यादवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये त्याने देवाच्या आशिर्वादाने मुलगी झाल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 8 मार्च महिला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:24 AM • 10 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

टीम इंडियाचा गोलंदाज उमेश यादव बाप बनला आहे. त्याची बायको तानियाने नुकताच एका चिमुकलीला जन्म दिला आहे.

उमेश यादव सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्ट सामने खेळत आहे. या सामन्या दरम्यान त्याला खुशखबर आली आहे.

उमेश यादवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये त्याने देवाच्या आशिर्वादाने मुलगी झाल्याची माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे 8 मार्च महिला दिनीच त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. या आगमनाने कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उमेश यादव आता दुसऱ्यांदा वडील बनला आहे. विशेष मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्या दरम्यान तो वडील बनला आहे.

उमेश यादव याआधी 2021 ला पहिल्यांदा वडील बनला होता. त्यावेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामने खेळत होती.

चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आहेत. आता टीम इंडिया किती धावा करते हे पाहावे लागेल.

दरम्यान चार सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1ने आघाडीवर आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा.

    follow whatsapp