विराट कोहलीला विश्रांतीची गरज आहे – माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्वाचं विधान

मुंबई तक

• 11:11 AM • 20 Apr 2022

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला मानसिकदृष्ट्या थकलेला आहे. तो पुढील पाच ते सात वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळू शकले, त्यासाठी विराटला विश्रांतीची सक्त गरज असल्याचं मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब फॉर्ममुळे चिंतेत असलेल्या विराट कोहलीला यंदा आयपीएलमध्येही फारशी चमक दाखवता आलेली नाही. RCB चा संघ […]

Mumbaitak
follow google news

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला मानसिकदृष्ट्या थकलेला आहे. तो पुढील पाच ते सात वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळू शकले, त्यासाठी विराटला विश्रांतीची सक्त गरज असल्याचं मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचलं का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब फॉर्ममुळे चिंतेत असलेल्या विराट कोहलीला यंदा आयपीएलमध्येही फारशी चमक दाखवता आलेली नाही. RCB चा संघ यंदा चांगली कामगिरी करत असतानाही विराट कोहली गेल्या सात सामन्यांमध्ये फक्त दोनवेळा 40 + धावसंख्या पार करु शकला आहे. गेल्या काही सामन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारच्या सामन्यांत विराट कोहली अजुनही शतक झळकावू शकला नाहीये. विराटने टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने वन-डे आणि कसोटी संघाचं कर्णधारपदही रोहित शर्माकडे सोपवलं आहे.

‘त्या’ वेळी मी मनातून घाबरलो होतो – विराटसोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल सूर्यकुमार यादवचं भाष्य

रवी शास्त्रींच्या मते येणाऱ्या काही काळात विराटला अतिशय जपून वापरावं लागणार आहे. कोरोना काळात बायो बबलमध्ये खेळत असताना अनेक भारतीय खेळाडूंनी मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची तक्रार केली होती. “मी थेट मुद्द्याला हात घालतो. विराट कोहली हा आता मानसिकदृष्ट्या थकलेला आहे. जर आता कोणाला सर्वात जास्त विश्रांतीची गरज असेल तर ती विराट कोहलीला आहे”, रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलत होते.

तुम्ही कोहलीला दीड महिने विश्रांती देताय की दोन महिने देताय, इंग्लंड दौऱ्याआधी विश्रांती देताय की नंतर देताय हे मुद्दे खरंतरं गौण आहेत. त्याला आता विश्रांतीची गरज आहे. पुढची 6-7 वर्ष तो भारतासाठी क्रिकेट खेळू शकतो आणि या मानसिक अवस्थेत त्याला खेळवून भारतीय संघ स्वतःचं नुकसान करुन घेऊ शकत नाही असंही शास्त्री यांनी स्पष्ट केलं.

आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध सामन्यातही विराट कोहली शून्यावर आऊट झाला होता. परंतू कर्णधार फाफ डु-प्लेसिसच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर RCB ने हा सामना 18 धावांनी जिंकला. लग्न झाल्यापासून मुलीच्या जन्मापर्यंत आणि सोबतीला क्रिकेट…विराट गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच पातळीवर व्यस्त आहे. तो सध्याचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू आहे. माझ्या मते त्याने काही महिने विश्रांती घेऊन सोशल मीडिया बंद करत पुन्हा एकदा स्वतःला ताजतवानं करावं असं शास्त्री म्हणाले.

    follow whatsapp