चेन्नई टेस्टमध्ये झालेला हा अनोखा रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई तक

• 07:09 AM • 14 Feb 2021

इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचवर भारतीय संघाने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताने ३२९ पर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशी ६ विकेट गमावत ३०० पर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी फारशी चमक दाखवता आली नाही. मोईन अलीने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत भारताला धक्का दिला. अखेरीस पंतने फटकेबाजी करुन आपलं […]

Mumbaitak
follow google news

इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचवर भारतीय संघाने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताने ३२९ पर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशी ६ विकेट गमावत ३०० पर्यंत मजल मारलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी फारशी चमक दाखवता आली नाही. मोईन अलीने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत भारताला धक्का दिला. अखेरीस पंतने फटकेबाजी करुन आपलं अर्धशतक साजरं केलं.

हे वाचलं का?

पहिल्या इनिंगदरम्यान चेन्नई टेस्टमध्ये एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. इंग्लंडने भारताला पहिल्या इनिंगमध्ये ३२९ धावांवर रोखलं. यादरम्यान इंग्लंडच्या बॉलर्सनी एकही एक्स्ट्रा रन दिली नाही. इंग्लंडकडून पहिल्या इनिंगमध्ये मोईन अलीने ४, ओली स्टोनने ३, जॅक लिचने २ तर कॅप्टन जो रुटने एक विकेट घेतली. एकही एक्स्ट्रा रन न देता सर्वाधिक धावसंख्या होण्याचा विक्रम यानिमीत्ताने चेन्नईच्या मैदानावर नोंदवला गेला.

१९५५ साली भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानला एकही एक्स्ट्रा रन न देता ३२८ धावांवर रोखलं होतं. दरम्यान भारतीय बॉलर्सनी चेन्नईच्या स्पिनींग ट्रॅकचा फायदा घेत इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये बॅकफूटला ढकलण्यास सुरुवात केली. इशांत शर्माने पहिल्याच ओव्हरमध्ये रोरी बर्न्सला एलबीडब्ल्यू आऊट केलं. यानंतर आश्विनने डोम सिबलेचा अडसर दूर केला. इंग्लंडच्या डावाला लागलेली गळती लंच सेशननंतरही सुरुच राहिली. बेन स्टोक्सला क्लिन बोल्ड करत आश्विनने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला.

    follow whatsapp